• १८ सप्टेंबर २०१९ ला जेव्हा  देश्याच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली कि भारतात ई- सिगारेट चे सेवन, उत्पादन, वापर, आयात, निर्यात, विकणे, साठवणे आणि जाहिरात या सर्वांवर आजपासून बंदी आहे आणि भारतात ई- सिगारेट अवैध आहे. 
  • देशात या मुळे अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काही लोकांचे म्हणणे होते कि ई- सिगारेट हे व्यसन नाही उलट हे लोकांचे सिगरेट चे व्यसन कमी करण्यास उपयुक्त आहे. तर सरकारच म्हणणं होत कि या मुळे तरुण पिढी ई-सिगरेट चे व्यसन करत आहे आणि भविष्यात याचा मोठा तोटा होऊ शकतो. 

आता तुम्ही जर म्हणत असाल कि, मी तर हे नावच पहिल्यांदा ऐकलं आहे तर तुम्ही अगदी योग्य ब्लॉग आणि आर्टिकल वर आहात. 

या आर्टिकल मधून तुम्हाला काय कळणार आहे?

  1. ई- सिगारेट म्हणजे नक्की काय  आणि इतिहास. 
  2. ई- सिगारेट नक्की काम कशी करते? 
  3. आरोग्यासाठी योग्य का अयोग्य?

चला तर मग वेळ न घालवता चालू करूयात. 

ई- सिगारेट म्हणजे नक्की काय आणि इतिहास

ई-सिगारेट ला ई-सिग, इलेकट्रोनिक निकोटीन डिलेव्हरी सिस्टिम, Vaporizer सिगरेट, Vape पेन्स सुद्धा म्हणतात. 

ई-सिगारेट चा शोध Hon Lik या चिनी Pharmacist ने २००३ साली लावला. Ruyan या कंपनी साठी ते काम करत होते. २००५-२००६ सालापासून चीन मधून निर्यात चालू केली. जगात आता याचे ४६० पेक्षा जास्त ब्रॅण्ड्स आहेत. चीन मध्ये याचे सेवन सर्वात जास्त केले जाते. भारतात आयात होणार माल हा प्रामुख्याने चीन मधून येत होता.  

ई- सिगारेट नक्की काम कशी करते?

यात ४ महत्वाच्या गोष्टी असतात,

Mouthpiece किंवा Cartridge 

या मध्ये द्रव्य पदार्थ असतो ज्यात निकोटीन आणि Propylene Glycol  असते. याच द्रव्याला तापवून वाफ बनवून शरीरात ओढली जाते. याला ई-Liquid किंवा ई-Juice सुद्धा म्हणतात. यात अनेक फ्लेवर्स असतात. जसे Watermelon, लावा फ्लो, मेंथॉल इत्यादी. या मधील Cartridge बदलू शकता किंवा पुन्हा भरू शकता. हे पूर्ण अवलंबून असते कंपनीवर. 

Atomizer

Mouthpiece च्या मागे चिटकून असलेला Part आहे. Cartridge मधील द्रव्याला तापवायचे काम हा करतो. याला पुढे एक Heating coil जोडलेली असते. 

बॅटरी 

Atomizer ला तापवण्यासाठी लागणारी ऊर्जा हि बॅटरी पुरवते. बऱ्यापैकी या Rechargeable लिथियम-आयन बॅटरी असतात. Optimizer आणि बॅटरी मध्ये Microprocessor असतो जो पूर्ण Functions कंट्रोल करतो. 

सेन्सर 

हे Led असतात. जेव्हा मशीन वापरात येते तेव्हा चालू होतात. 

आता तुम्हाला पूर्णपणे कळालेच  असेल कि इलेकट्रीक सिगारेट मध्ये निकोटीन ची वाफ बनवण्याची प्रक्रिया काय आहे ते. 

आरोग्यासाठी योग्य का अयोग्य?

प्रथम असा समाज होता कि सिगारेट स्मोकिंग चे व्यसन सोडवण्यासाठी ई-सिगारेट निर्माण केली गेली आहे. यात सिगारेट प्रमाणे निकोटीन ला न जाळता, निकोटीन मधील Solution ची वाफ केली जाते. “World Health Organisation” नुसार हे द्रव्य एक प्रकार चे Toxin आहे. 

  • गर्भधारणेच्या वेळी याचे सेवन घटक ठरते. निकोटीन हे अर्भकाच्या Brain Development वर परिणाम करते. 
  • जे लोक स्मोकिंग करत नाहीत त्यांना  ई-सिगारेट चे व्यसन लागलेले आढळून आले. मधील निकोटीन च्या प्रमाणावरून घातकता ठरवली जाते.  
  • DNA damage होण्याची श्यक्यता असते. 
  • BGM  मध्ये फेब्रुवारी २०१८ जो Report सादर झाला त्यात त्यांनी United Kingdom च्या डॉक्टरांना सांगितले आहे कि ई-सिगारेट हि सिगारेट पेक्षा ९५% जास्त घातक आहे.

आजच्या आर्टिकल मध्ये एवढाच. तुमचे प्रश्न, अभिप्राय, कंमेंट्स खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मधून आम्हाला कळवू शकता. अशीच महत्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती मराठी मधून मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट देत राहा.