1 डिसेंबर 2019 पासून देशातील प्रत्येक टोल प्लाझा वरील सर्व वाटा आता FasTags आधारित होणार आहे. National Highways Fee Rules, 2008 नुसार टोल प्लाझा वरील सर्व वाटा आता ह्या FasTags उपभोगत्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. जर तुम्ही FasTag न लावता, टोल क्रॉस करणार असाल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.

टोल प्लाझा वरील एक वाट ही अशी ठेवण्यात येईल की ज्या ठिकाणी FasTag असलेल्या आणि FasTag नसलेल्या वाहनांसाठी असेल. तेथे कॅश मध्ये दुप्पट पैसे भरून FasTag नसलेले वाहन जाऊ शकतात.

FasTags कोठे खरेदी करू शकता?

 • सध्या प्रत्येक टोल प्लाझावर FasTags सरकार कडून मोफत वाटले जात आहेत. परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला विकत घ्यायच असेल किंवा 1 डिसेंबर नंतर घ्यायचं असेल तर तुम्ही खालील मुद्दे वाचा.
 • काही निवडक बँका मध्ये, टोल प्लाझा वरील ठिकाणी सुद्धा FasTags मिळतील.
 • तुम्ही FasTags ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. Amazon वर तुम्हाला FasTags मिळून जातील.

FasTags कशाप्रकारे रिचार्ज करायचं?

जेंव्हा तुम्ही FasTags विकत घेता, तेंव्हा तुम्हाला त्या FasTags चे एका मोबाईल अँप मध्ये डिटेल्स टाकून ते तुम्हाला ऍक्टिवेट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तो ऍक्टिवेट झालेला FasTag तुमच्या चालू बँक खात्यासोबत जोडावा लागेल, जेणेकरून तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्स काढून घेतलं जाईल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेटबँकिंगचा वापर करून तुम्ही FasTags रिचार्ज करु शकता किंवा डायरेक्ट तुमचं बँक खात लिंक सुद्धा करू शकता.

FasTag वापर कर्त्यांना 2019-20 साठी 2.5% कॅशबॅक सुद्धा दिलं जाणार आहे. हायवे मंत्रालयानुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत 60 लाख FasTags दिले गेले आहेत की ज्यांचं संपूर्ण ETC कलेक्शन हे 12,850 कोटी इतकं आहे.

नवीन FasTags बद्दलचे महत्वाचे 10 नियम –

 1. National Highway Authority of India यांनी सांगितलेल्या नियमानुसार टोल प्लाझा वर फक्त एक वाट ही अशी ठेवण्यात येईल जेथून FasTags नसलेले वाहन सुद्धा जातील.
 2. डिसेंबर 1 पर्यंत सरकार हायवे काउंटरवर FasTags मोफत वाटत आहे. परंतु ते रिचार्ज मात्र तुम्हाला स्वतःला करावं लागेल. FasTags ला लोकप्रियता मिळवण्यासाठी सरकार ते मोफत वाटत आहे.
 3. जर तुम्ही FasTags ऑनलाईन मागवत असाल तर त्याची किंमत 100 रुपये इतकी आहे. Amazon वर FasTags ची किंमत 100 इतकी आहे. 1 डिसेंबर नंतर FasTags दुसरीकडे कोठेही मोफत मिळणार नाहीत.
 4. FasTags हे जवळपास 28500 वेगवेगळ्या ठिकाणी विकले किंवा दिले जात आहेत. अनेक बँकांनी आणि IHMCL/NHAI यांच्यामध्ये NH fee प्लाझा, RTOs, Common Service Centres, ट्रान्स्पोर्ट हब, बँक ब्रँच आणि काही निवडक पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.
 5. अनेक बँकांच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तसेच Amazon वर सुद्धा तुम्ही FasTags खरेदी करू शकता. SBI, ICICI, Axis Bank, Paytm Payment Bank, HDFC bank, IDFC bank इत्यादी बँकांच्या वेबसाईटवर FasTags विकले जात आहेत.
 6. FasTags खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे द्यावे लागतील. RC of vehicle, पासपोर्ट साईझ फोटो, तसेच गाडीमलकाचे KYC कागदपत्रे इत्यादी.
 7. FasTags मिळाल्यानंतर तुम्हाला ते ऍक्टिवेट करावं लागेल. त्यासाठी संबंधित माहिती MY FASTag मोबाईल अँप्लिकेशन मध्ये भरावी लागेल.
 8. जर एखादी कार FasTag न लावता टोल प्लाझाच्या वाटेवर आली तर त्या गाडीचालकाला असलेल्या फीस पेक्षा दुप्पट फीस भरावी लागेल.
 9. तुम्हाला FasTags पोर्टलवर userID आणि पासवर्ड टाकून login करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला पेमेंट आणि topup साठी ऑप्शन मिळेल. त्यांनतर Recharge वर क्लिक करा, त्यानंतर wallet ID सिलेक्ट करा आणि तेथे पैसे ऍड करा. जर तुम्ही लिमिटेड KYC होल्डर असाल तर तुम्ही 10000 पेक्षा जास्त रक्कम FasTag प्रीपेड खात्यावर भरू शकत नाही. तुम्ही जर full KYC होल्डर असाल तर तुम्ही तुमच्या खात्यावर 1 लाखापर्यंत रक्कम भरू शकता. तुम्ही ही रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग, UPI द्वारे भरू शकता.

FasTags हे दुसरं तिसरं काही नसून इलेक्ट्रॉनिक टॅग आहेत जे तुमच्या गाडीच्या समोरच्या काचेवर बसवले जातात. जेंव्हा तुमची कार टोल गेट जवळ येते तेंव्हा टॅग रीडर तुमचं FasTag स्कॅन करतं आणि टोल चार्जेस मानवी हस्तक्षेपविना कटवून घेतं.