- आपल्याला आत्ता पर्यंत हे तर नक्कीच कळलं असेल कि Technology चे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. आज तोट्यां मधील Hidden कॅमेरा या विषयावर तुम्हाला काही महत्वाचा गोष्टी थोडक्यात सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही सावध राहू शकता.
- तुम्ही, मे २०१९. उत्तराखंड मधील हॉटेल ची बातमी वाचलीच असेल. एका जोडप्याला त्यांच्या रूम मध्ये फॅन च्या आत Hidden camera सापडला. त्यांनी पोलिसांच्यात तक्रार केली आणि Privacy violation च्या Under हॉटेल मालकाला अटक केली.
- Hidden कॅमेरा शोधणे अगदी सोप्पे आहे आणि आम्ही इथे काही खूप सोप्प्या टिप्स दिलेल्या आहेत ज्या वापरून तुम्ही या Scam पासून वाचू शकाल.
या आर्टिकल मधून तुम्हाला काय कळणार आहे?
- Hidden camera म्हणजे नक्की काय आणि प्रकार.
- छुपे कॅमेरे असण्याची ठिकाणे आणि त्यांना शोधण्याचे उपाय.
- Hidden camera असल्यास अथवा मिळाल्यास काय कराल?
चला तर मग सुरु करूयात,
Hidden camera म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार कोणते?

Credit – gannett-cdn.com
Hidden कॅमेरा म्हणजे तुमच्या परवानगी शिवाय लपून तुमचे Shooting अथवा Photo काढण्यासाठी लावलेला कॅमेरा. हे अगदी लहान न दिसणारे असतात. तुमच्या Private life चे चित्रीकरण करून काही लोक त्याचे भांडवल करतात आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही. भारतात अश्या अनेक Cases घडल्या आहेत कि ज्या मुळे हा विषय गंभीर बनला आहे. असे कॅमेरे वापरून Blackmailing करणे काहींचा धंदा बनला आहे. आता तुम्हाला कळाले कि Hidden कॅमेरा म्हणजे नक्की काय.
Hidden camera चे प्रमुख ३ प्रकार असतात कि जे त्याच्या Fetures वरून ठरवतात.
- WiFi enabled – हा वायरलेस छुपा कॅमेरा असतो . याचे शूटिंग याच्या WiFi ला कनेक्ट असणाऱ्या सर्व devises वर दिसते.
- One way wire connection – सोप्प्या शब्दात सांगायचे झाले तर एक प्रकारे CCTV असतो. यात एक वायर जॉईन असते.
- Camera with adapter – हा जुन्याप्ररातील आणि शोधण्यास सर्वात सोप्पं कॅमेरा आहे.
छुपे कॅमेरे असण्याची ठिकाणे आणि शोधण्याचे उपाय

Image Credit – bbc.com
Hidden camera नावावरूनच कळू शकेल कि कोतोतरी Hide केला असणार. कोणत्या हि हॉटेल Room मध्ये अश्या ठराविकच जागा असतात जेथे त्यांना Hidden camera लावता येऊ शकतो. खाली काही अशीच ठिकाणे लिहिलेली आहेत ज्या मध्ये Hidden कॅमेरा आपण शोधू शकता.
- Smoke detector
- AC power adapter
- Alarm sensor
- Telephone
- Desk or standing lamp
- Power outlet
- Wall clock
- Mirror
- Alarm clock
- Soapdish
- Toothbrush holder
- Tissue boxes
- A DVD player or other set-top box इत्यादी.
हि तर झाली ठिकाणे आता शोधण्यासाठी काय करायचे ते पाहुयात.
- Manual survey – स्वतः रूम मध्ये फिरा आणि वरील नमूद केलेल्या ठिकाणांचा Survey करा.
- तुमच्या इंद्रियांची मदत घ्या– काही Motion sensor कॅमेरा हे चालू झाल्यावर विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. टीवी आणि इतर गोष्टी बंद करा आणि कोठून Unknown आवाज येतोका हे पहा.
- तुमचा Mobile phone वापरा – Room मधील सर्व लाईट्स बंद करा आणि आपल्या Mobile चा कॅमेरा चालू करीन सर्वे करा. जेथे तुम्हाला लाल dot दिसला तर तो Hidden कॅमेरा आहे. तसेच जर कोणती संदिग्ध अशी LED लाईट दिसून आली तर त्याचा लगेच सर्वे करा.
- आरश्या च्या मागील कॅमेरा ओळखा – आरश्या च्या मागे बरेच Hidden कॅमेरे लावतात. फक्त Hotel रूम मधेच नाही तर Shopping center मधील Changing room मध्ये सुद्धा. या साठी Room मधील Lights पूर्ण off करा आणि आरश्या मध्ये काही फरक दिसतो का पहा. तुम्हाला मागील लपलेला कॅमेरा दिसेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये लाल डॉट दिसेल.
- सर्व सॉकेट तपासून घ्या – काहीवेळा जुन्या प्रकारातील कॅमेरे हे adaptor च्या साहायाने चालू केलेले असतात. असे असं संशयित अडाप्टर तुम्ही पडताळून घ्या.
- Signal डिटेक्टर चा वापर – हे एक Device असते जे लपलेले कॅमेरे आणि अन्य Electronic device शोधण्यास मदत करते. तुम्ही जर कायम नवनवीन हॉटेल्स मध्ये राहत असाल तर अश्या प्रकारचे एक Device तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो.
Hidden camera असल्यास अथवा मिळाल्यास काय कराल?
प्रथम हे समजणे गरजेचे आहे कि तुमचे लपून फोटो अथवा व्हिडीओ काढणे हा कायद्याने गुन्हा आहे. इथे तुमच्या Right to privacy जो भारतीय संविधानातील PART ३ मधील आर्टिकल- २१ मध्ये नमूद आहे. हा तुमचा Fundamental right असल्या मूळे तुम्ही या संदर्भात सरळ Supreme Court of India मध्ये जाऊ शकता.
सर्व प्रथम १०० नंबर वर कॉल करून पोलीस बोलवू शकता. तसेच तुमच्या सोशल नेटवर्किंग द्वारे याचे व्हिडीओ टाकल्यास त्या हॉटेल मालक आणि संबंधीत व्यक्तींना अटक करण्याचे Pressure पोलिसांवर असते. पण कृपा करून तुम्ही तसेच काही न करता जाऊ नका कारण तुम्ही नाही तर दुसरे कोणीतरी या Scam चा शिकार होऊ शकतो.
आजच्या आर्टिकल मध्ये इतकच. अशा प्रकारचे आणखी Interesting आणि माहितीपूर्ण आर्टिकल्स मराठी भाषेतून मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉग ला असेच भेट देत राहा. तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले, तुमचे प्रश्न, शंका,अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स चा वापर करा.