- भारत आणि उत्तरेकडील प्रदेश म्हंटल की नाव येते जम्मू आणि कश्मीर च. जे कधी काळी कुशाल साम्राज्याचा केंद्रबिंदू होते.
- चौथी Buddhist council (कुंडलवन काश्मीर ७२ AD ) येथेच झाली होती आणि महायान बुद्धिस्ट पंथाचा उदय झाला होता.
- हीच ती भूमी जिथे हिंदू डोग्रा राजांनी राज्य केले काश्मिरी पंडित अथवा काश्मिरी ब्राम्हण दललेक च्या किनारी वेदपठण करत.
- हीच ती भूमी ज्या भूमीत मुघल राजांनी सुंदर बाग बांधल्या आणि याच भूमीतील ब्राम्हणांच्या धर्म रक्षणा साठी शिखांचे नववे गुरु, “गुरु तेज बहादूर” यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा अनेक गोष्टीं मुळे हा भाग भारताच्या संस्कृती चा एक अविभाज्य घटक बनलेला आहे.
साध्य परिस्थितीत ज्याप्रमाणे पाकिस्तान आणि काही फुटीरतावादी काश्मिरी भारतातून हा भाग वेगळा व्हायचे स्वप्न बघतात त्यांची मते एकमेकांशी संलग्न नाहीत. पाकिस्तान म्हणतो कि मुस्लिम बहुल प्रांत असल्याने हा भाग पाकिस्तान मध्ये हवा. फुटीरतावादी काश्मिरीं ना हे माहित आहे कि जर हा भाग पाकिस्तानात शामिल झाला तर नोकरी सोडाच पाकिस्तानी म्हणून दुसऱ्या देशांचा व्हिसा मिळणे सुद्धा अवघड होईल. त्या मुळे काही मूठभर फुटीरता वादी एक नव्या देशाचे स्वप्न दोन ते तीन दशके पाहतच आले आहेत आणि हे स्वप्नच राहणार.
चला तर मग मुद्यावर येऊ, या आर्टिकल मधून तुम्हाला काय कळणार आहे?
आपण विचार करताना भारताच्या दृष्टीकोनातून हा प्रदेश महत्वाचा का आहे हे जाणून घेणार आहोत ( ज्या प्रमाणे महाराष्ट्र भारतासाठी औद्योगिक कारणांसाठी, गोवा हे पर्यटना साठी, नागालँड आणि मणिपूर हे दक्षिण – पूर्व आशिया सोबत संबंधा साठी. )
१. Resources आणि फलोत्पादन –
जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामधून सिंधू, शोक,गिलगिट, झेलम, किशनगंगा अश्या बारमाही नद्या वाहतात. पाणी आणि उत्तमप्रतीची मृदा या मुले येथे Horticulture अथवा फळउत्पादन मोठ्याप्रमाणावर होते आणि भारत सरकार यात अनेक प्रकारे गुंतवणूक करत आहे. काश्मिरी सफरचंद, अक्रोड, केशर हे Export होते आणि भारत सरकार ला यातून परकीय चलन भेटते. अप्रतिम नैसर्गिक सुंदरता असलेल्या प्रदेशात भारत सरकारने अनेक प्रकल्प राबवले आहेत जेणेकरून Tourism च्या माध्यमातून प्रत्येक हाताला काम मिळू शकेल. भारत सरकार ने जम्मू आणि काश्मीर ची Connectivity वाढावी या साठी रस्ते, बोगदे ( जवाहरलाल नेहरू tunnel ), धरणे बांधली आहेत.
२. Strategic importance –
भारताचा उत्तर भाग हा कायमच रणनीती दृष्टया महत्वाचा ठरला आहे. जेव्हा जेव्हा मोठी परदेशी आक्रमणे झाली ती उत्तर-पश्चिम दिशेकडूनच झाली . काश्मीर हा पाकिस्तान,चीन यांच्या मध्ये आहे आणि अफगाणिस्थान ला सीमा लागून आहे . चीन सोबत १९६२ आणि पाकिस्तान सोबत १९६५ साली भारताचे युद्ध झाले आहे त्या मुळे त्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवण्याचे काम हा प्रदेश करत असतो . या प्रदेशमधील सियाचीन ग्लेशियर जे भारताचे आहे आणि जगातील सर्वात उंच अशी Battle Field म्हणून प्रसिद्ध आहे तेथे भारतीय सैनिक तैनात असतात. पाकिस्तान आणि चीन वर नजर ठेवून असतात . तसेच पाकिस्तान वर एकप्रकारे वचक अथवा Deterrence साठी हा भाग अत्यंत महत्वाचा आहे . श्रीनगर हवाई अड्डा हा पाकिस्तान ची राजधानी इस्लामाबाद वर नजर ठेवण्यासाठी महत्वाचा आहे . या दोन्हीं मधील लांबी फक्त १६७ किमी आहे. आणि पाकिस्तान ला याच कारणासाठी काश्मीर हवा आहे आणि यासाठी ते धर्माच्या नावाने हा भाग मिळावा असा बाबत करतात.
३. भौगोलिक महत्व –
ज्या प्रमाणे आपण पहिले कि येथून अनेक नद्या वाहतात. याच नद्या पुढे पाकिस्तान ला पाणी देतात. पाकिस्तान ची ९०% शेती हि या पाण्यावर अवलंबून आहे. भारत आणि पाकिस्तान यान मध्ये Indus Water Treaty हा करार झाला आहे. या करार World bank च्या माध्यमातून झाला आहे या अंतर्गत बियास, रवी, सतलज चे पाणी भारत वापरणार आणि इंडस, चिनाब, झेलम चे पाणी पाकिस्तान वापरणार. भारत आणि पाकिस्तान ने या Treaty चा आदर ठेवला आहे. मात्र पाकिस्तान ला एक गोष्ट माहित आहे कि भारताकडे हि क्षमता आहे कि, भारत हे पाणी बंद करू शकतो. आणि जर शेतीच नसेल तर राष्ट्र अराजकतेच्या दिशेने जाते.
४. भारतीय लष्कर –
खडे लष्कर हे त्या राष्ट्रा वरील Liability अथवा राष्ट्रा च्या संपत्तीवर एक बोजा असतो. त्यामुळेच इंग्रजांनी भारतात हॉकी, क्रिकेट, हॉर्स पोलो इत्यादी खेळ आणले आणि सैन्याला जेव्हा युद्ध नसे तेव्हा ते खेळात गुंतवत. भारतीय सैन्य हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे, भारतीय सैन्यात एकूण १३,६२,५०० Personnels आहेत. या सैन्याचा खर्च हि मोठा असतो. भारतीय Tax payers च्या माध्यमातून हा खर्च भागवला जातो. सैन्याला गुंतवून ठेवण्यासाठी काश्मीर खोरे हा भाग अत्यंत महत्वपूर्ण आहे. जगातील सर्वात जास्त सैन्य जर कोणत्या भागात तैनात असेल तर तो हाच प्रदेश.
५. आंतराष्ट्रीय महत्व –
अनेक काश्मिरी लोक हे भारता बाहेर व्यवसाय अथवा शिक्षणासाठी गेले आहेत आणि तेथून भारतात त्यांच्या घरी पैसा पाठवतात. यालाच आपण Remittance असे हि म्हणतो या मुळे भारतात परकीय चलन येत असते. तेथील काश्मिरींना भारतीय Diaspora म्हणतो. Diaspora हा त्या राष्ट्रामधील राजकीय परिस्थिती वर प्रभाव पाडतो. या मुळे अनेक देश हे भारताच्या बाजूने उभे राहण्याला प्राधान्य देतात. तसेच हा प्रदेश भारताच्या सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमेचे एक उत्तम उदाहरण आहे. तसेच भारत सरकार येथील विद्यार्थ्यांसाठी शासकीय परीक्षा आणि आंतराष्ट्रीय शिक्षणासाठी वेगळा कोठा देत असते.
काश्मीर चा विषय निघाला आणि त्यात पाकिस्तान चा उल्लेख नाही असे कसे होऊ शकते? आपल्याला पाकिस्तान मधून होणारी घुसखोरी तर माहीतच आहे. पाकिस्तानी संसदेत (जेव्हा अस्तित्वात असते तेव्हा) काश्मीर प्रश्नाला धार्मिक मुद्दा बनवून घातला जाणारा गोंधळ हि माहित आहे. पण पाकिस्तान आणि काश्मीर यांचा ऐतिहासिक संबंध लक्षात घेणे सुद्धा गरजेचे आहे. चला ते हि थोडक्यात समजून घेऊ.
पाकिस्तान ला काश्मीर का हवा आहे?
- १९३३ मधे चौधरी रहमत अली यांच्या मार्फ़त पाकिस्तान हा शब्द प्रथम वापरण्यात आला. आधी हा शब्द पाकस्थान (PAKSTHAN ) असा होता हा पंजाब, उत्तर-पश्चिम फ्रंटियर अथवा अफगाण प्रोव्हिन्स , काश्मीर, सिंध, बलुचिस्थान यां साठी एकत्रित वापरण्यात येत. उच्चाराच्या सोइसाठी नंतर i लावण्यात आला आणि हा पाकिस्तान ( PAKISTAN ) शब्द तयार झाला. म्हणजे पाकिस्तान हा शब्द जो बनवलेला होता तो काश्मीर विना अपुरा आहे.
- पाकिस्तान चे अध्यात्मिक पिता अल्मा इक्बाल हे काश्मिरी होते आणि त्यांच्या मते जे इस्लामिक भारताचे स्वप्न आहे ते काश्मीर च्या स्वातंत्रा शिवाय अपूर्ण आहे.
- पाणी सुरक्षे ची गरज – पाकिस्तान च्या ९० टक्के शेतीला सिंधू नदी च्या पाण्याचा आधार आहे. जर नदीचा प्रवाह बदलला तर पाकिस्तान मध्ये भयानक परिणाम उमटतील. सिंधू च्या दोन महत्वाच्या उपनद्या झेलम आणि चिनाब या जम्मू आणि काश्मीर मधून येतात.
- त्यांना भरता पेक्षा एक ने वरचढ व्हायचे आहे.
आता या वर पूर्ण विचार केला तर काश्मीर भाग हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच हे स्पष्ट होते. जर कोणते राष्ट्र एखाद्या प्रांताच्या Development आणि रक्षणासाठी एवढा खर्च आणि प्रयत्न करत असेल तर ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी हि सुद्धा स्वतःच घेत असते. मी आपल्या समोर अगदी मोजक्या शब्दात हि एक बाजू मंडळी आहे जी धार्मिक नसून Practical आहे. पाकिस्तान धार्मिक मुद्यांचा वापर करून काश्मीर वर आपला अधिकार आहे असे सांगतो. त्यात त्यांची काहीच चुकी नाही कारण पाकिस्तान हा देशच इस्लाम या संकपनेवर उदयास आला आहे आणि या उलट भारत हा धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्म समभाव या संकल्पनेवर टिकून आहे.
आपल्याला हे आर्टिकल कसे वाटले आणि आपले याबद्दल काय विचार आहेत हे आमच्यापर्यंत नक्की पोहचवा. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या Comment box चा वापर करू शकता आणि अशीच माहिती मराठी मधून मिळवण्यासाठी आम्ह्लाला भेट देत राहा .