What Is EMI on Debit Card?

बऱ्याचशा Online shopping करणाऱ्या लोकांना माहित असेल कि EMI बऱ्यापैकी Credit card  नेच Pay केलं जाते. 

पण आपण Debit card वापरून पण EMI pay करू शकतो का? याच उत्तर आहे, हो. हि सुविधा फक्त दोन Bank च्या debit card साठी उपलब्ध आहे त्या म्हणजे,

  1. ICICI Bank 
  2. Axis Bank 

ICICI भारतातील प्रथम अशी Bank आहे ज्यांनी Debit card वर EMI (Equated Monthly Installment ) चालू केलं होत. 

 

Axis bank आणि ICICI बँक दोघे जरी Debit card वर EMI सुविधा देत असल्या तरी त्यांच्या अटी वेगवेगळ्या आहेत. सध्या समजण्यासाठी आपण ICICI bank चे उदाहरण घेणार आहोत. 

या आर्टिकल मधून आपल्याला काय कळणार आहे?

  1. ICICI Bank चे Debit card वापरून EMI कसा Pay करायचा?
  2. ICICI Bank  च्या Debit card वर EMI scheme कशी Avail कराल?

चला तर मग सुरु करूयात,

१. ICICI bank चे Debit card वापरून EMI कसा Pay करायचा?

ICICI bank च्या Official website वर जी माहिती आहे त्याचा सारांश मी इथे लिहिला आहे जेणेकरून तुम्हाला Website वर जाऊन पूर्ण वाचायची गरज भासणार नाही. आपण हि माहिती प्रश्न-उत्तर या स्वरूपात पाहुयात. 

यासाठी कोणती Processing fees आहे?

नाही 

Tenure option आणि Respective interest rate किती आहे?

तुम्ही ३,६,९,१२,१८,२४ महिन्यांसाठी EMI ची सुविधा वापरू शकता. ३,६,९,१२ महिन्यांच्या EMI साठी चा व्याज दार १३% आहे आणि १८,२४ महिन्यासाठी १८% आहे. 

या सुविधेला कोण वापरू शकणार आहेत?

सर्व Savings account holders आणि काही Current account holders ज्याचे काही Fixed deposit आहे किंवा Recurring deposit आहे जे त्या Same account च्या सोबत Linked आहे. यात बसणारे सर्व जण हि सुविधा वापरू शकतात. 

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि हि सुविधा Tax saver fixed deposit अथवा PPF साठी उपलब्ध नाही आणि या सेवेचा लाभ घेण्यासाठी फिक्स्ड deposit असणे गरजेचे आहे. 

Debit card EMI option साठी कमीत कमी किती रुपयांचे Transaction applicable होतात?

EMI participating stores वर १०,००० रुपयां पेक्षा जास्त किमतीच्या Transaction साठी हि सुविधा उपलब्ध आहे. 

हे लक्षात ठेवा –

  • EMI करण्यासाठी Customers ला Maximum limit दिली जाते ती तुमच्या Fixed deposit च्या Principle value किंवा त्यासाठी Recurring deposit चे ९०% असणार. 
  • EMI tenure fixed deposit maturity date पेक्षा कमी असला पाहिजे, जर तुम्ही असे करू नाही शकला तर बँक आपली EMI conversion ची Request अवैध ठरवू शकती आणि आपल्या Fixed deposit ला Auto renew करू शकते. 

आपण official  website वर त्यांच्या टर्म्स आणि कंडिशन वाचू शकता. 

 

Debit card EMI वरून Pay करण्यासाठी ICICI बँक सोबत कोणकोणत्या Brands नि Tie-up केलं आहे?

  • Apple नि Smartphone साठी. 
  • Samsung ने Smartphone आणि consumer products साठी. 
  • Haier, hero motors, firefox, Kurion, Lenovo, Nikon, sharp, Sleepwell, Suzuki motors, TVs motors, Vespa motors आणि VLCC इत्यादी. 

EMI च्या जवळील Facility चा शोध कसा घ्याल?

तुमच्या जवळील ICICI debit card EMI store शोधण्यासाठी,

SMS करा, EMI< space > PIN Code ५६८८६ वर

 

ICICI Bank  च्या Debit card वर EMI scheme कशी Avail कराल?

आपल्या ICICI bank debit card सोबत ठेवून कोणत्याही Participating merchant brand च्या Store ला Visit करा आणि खाली दिलेल्या Steps follow करा. 

  • Participating brand चा  कोणताही प्रॉडक्ट घ्या. 
  • Sales executive ला याबाबत सांगा कि तुम्ही हि वस्तू Debit कार्ड च्या EMI option वरून घेऊ इच्छिता . 
  • ते तुमचा Total purchase amount enter करतील आणि आपल्या Debit card ला Swipe सुद्धा करतील. आपल्या Transaction ला Authenticate करण्यासाठी तुम्हाला तुमचा PIN टाकायला लागणार. 
  • आता जी किंमत तुम्ही टाकली आहे ती तुमच्या Debit card मधून Deduct  झाली असेल. तुम्हाला एक रिसीट मिळेल त्यामध्ये त्या Specifik transaction साठी EMI facility ला avail करण्यासाठी Details दिलेले असतील. 
  • त्या स्लिप वर तुम्हाला सही करून त्या Sales personnel ला द्यायची आहे .
  • Transaction ला EMI मध्ये रूपांतरित केलं जाईल . तुम्हाला तुमच्या योग्यते नुसार Tenure अथवा कालावधी Select करावा लागणार. त्या नुसार तुमच्या Debit card मधून ती किंमत दार महिना Deduct अथवा कमी केली जाणार. 
  • दोन कार्यालयीन दिवसात तुमचे Deduct झालेले पैसे तुमच्या Account मध्ये परत येतील. 
  • पहिली Installment तुमच्या Date of reversal च्या ३० दिवस नंतर कमी होईल. 
  • Transaction आणि EMI आपल्या Statement वर दिसतील. 

जो पर्यंत तुमचा पूर्ण EMI pay होत नाही तो पर्यंत तुम्ही तुमच्या  Fixed deposit ला Cash मध्ये बदलू शकणार नाही. 

Axis Bank साठी सुध्या हि सारखीच Procedure आहे. आम्ही लवकरच ती माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवू. 

 

या आर्टिकल मध्ये इतकाच. तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले, तुमच्या शंका, प्रश्न, अभिप्राय आम्हाला नक्की  कळवा. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या Comment box चा वापर करू शकता. मराठी मधून अशीच नाव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉग ला नक्की visit  करा.