‘जॅक मा’ उद्योग जगतातील एक सुप्रसिद्ध नाव, आपल्या कौशल्य आणि कसबाच्या जोरावर आपल्या देशातील लोकांचे राहणीमान, त्यांची वेशभूषा, त्यांची खेळ खेळण्यापासून अगदी ते पैसे कसे हाताळतात इथे पर्यंत एक क्रांतिकारक बदल घडून आणणारे जॅक मा हे चीनचे रहिवासी असून, ते अलिबाबा ग्रुपचे संस्थापक आहेत. ते या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर गेल्या 20 वर्षापासून कार्यरत होते. आपल्या तरुण वयातच त्यांनी या कंपनीची स्थापना केली होती, ते सध्या 54 वर्षाचे आहेत. त्यांनी नुकतंच New York Times या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की ते आता अलिबाबा ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार घेणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांकडून भावनिक मागणी केली जात आहे की, ‘जॅक मा तुम्हीच या ग्रुपच्या मुख्य कार्यकारी पदावर राहा’, पण जॅक मा यांचा निर्णय अटळ आहे.

त्यांनी या कंपनीच्या उभारणीसाठी खूप कष्ट केलं आहे म्हणूनच त्यांच्याच कार्यकाळात कंपनीची इक्विटी व्हॅल्यु USD 420 बिलियन एवढी होऊ शकली. त्यांच्याच मुळे चीनमधील शेकडो लोकं अब्जावधीश होऊ शकले. त्यांनी चीनमधीलच नाही तर संपुर्ण जगातील ई-कॉमर्स औद्योगिकीकरणात उल्लेखनीय बदल घडवून आणले.

ई-कॉमर्स क्षेत्रातील बदलाचे ‘जॅक मा’ हे शिल्पकार आहेत.

Bloomberg Billionaires Index यांच्या नुसार जॅक मा यांच्याकडे जवळपास USD 40 बिलियन एवढी संपत्ती आहे. ते जर या ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणखी पुढे राहिले असते तर ते आणखी जास्त कमवू शकले असते, परंतु त्यांनी या पदाचा राजीनामा देण्याचं निश्चित केलं आहे. या क्षेत्रातून बाहेर पडून ते आपली पूर्ण ऊर्जा, शक्ती आणि बुद्धी त्यांच्या आवडत्या क्षेत्रात गुंतवणार आहेत, आणि ते क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. त्यांना शिक्षणाची खूप आवड आहे आणि ते पुढे शिक्षण क्षेत्रामध्येच काम करणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. कंपनीची स्थापना करण्याच्या आधी मी इंग्रजी विषयाचा शिक्षक असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं.

जॅक मा हे अमेरिकेतील चीनचे बिगर-कार्यलयीन राजदूतच होते. चीनमधलं जॅक मा यांचं योगदान खूप मोठं आहे, अलिबाबा ग्रुप मधील बऱ्याच कंपन्यांनी चीन मधल्या लोकांसाठी, त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या सुखसोयी साठी खूप काम केलं आहे. त्यांच्यातीलच Taobao कंपनीने चीनमध्ये जवळपास 3 कोटी 70 लाख लोकांना रोजगार मिळवून दिलाय. अशा अनेक कंपन्या या ग्रुप मध्ये आहेत.

आता अलिबाबा एक जागतिक दर्जाची कंपनी झाली असल्यामुळे तिच्यामध्ये आता उत्कृष्ट प्रशासन यंत्रणा आणि कार्यप्रणाली आहे. या कंपनीचे कर्मचारी कष्टाने या कंपनीसाठी काम करत असल्यामुळे, मी आता कोणतीही काळजी विना या पदावरून राजीनामा देऊ शकतो. या कंपनीमध्ये अनेक मोठे अधिकारी आहेत जे यापुढे या कंपनीला पुढे घेऊन जाण्याचं काम करणार आहेत, असं सांगत त्यांनी आपण या कंपनीच्या CEO पदावरून उतरत असल्याचं निश्चित केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here