अमेरीकेचे अध्यक्ष Donald Trump हे भारतासारख्या अतिमहत्वाच्या देशाकडे दूर्लक्ष करत असल्याचं मत ओबामा प्रशासनातील अमेरिकेचे माजी डिप्लोमॅट Tim Roemer यांनी गुरुवारी होणाऱ्या 2+2 मीटिंगच्या काही काळ अगोदर व्यक्त केलंय.

2+2 मीटिंग म्हणजे भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारमन आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेच्या US Secretary of State ‘Mike Pompeo’ आणि Defence Secretary ‘Jim Mattis’ यांची भेट होय. ही या उभय देशामधली पहिली 2+2 भेट असणार आहे.

अगोदर ही भेट दोन वेळेस पुढे ढकलण्यात आली होती. आधी 27 जुन रोजी ठरवण्यात आली होती, नंतर ती पुढे ढकलून 6 जुलै ला ठेवण्यात आली आहे. परंतु पुन्हा एकदा ती पुढे ढकलून सप्टेंबर मध्ये ठरवण्यात आली, असं अमेरिकेचे माजी डिप्लोमॅट Tim Roemer यांनी Foreign Policy Magzine च्या पत्रकारांशी बोलताना उघडपणे सांगितले.

उभय देशासमोर असलेल्या समस्यांच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी एकमेकांना पुरेसा वेळ देणे आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकमेकांत विश्वासार्हता आणि संबंध वाढवणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

भारताकडून होत असलेल्या संबंधांना अमेरिकेकडून हात दाखवले जात आहे. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेबरोबर भारताचे उज्ज्वल भविष्य पाहत आहेत पण Trump मात्र भारताचे महत्व समजायला तयार नाहीत. मोदींनी आपल्या शेजारील देशाबरोबरील संबंध संतोलाने हाताळत आणि रशिया सोबतच्या आर्म्स खरेदीत यश मिळवत, डोकलाम प्रश्न व्यवस्थित सांभाळत अमेरिकेबरोबर आपले संबंध वाढवण्याचे प्रयत्न केले आहेत.

मोदींनी अमेरिकेला आपले United Nations च्या security council मधील कायमच्या सदस्यत्वासाठी UN मधील भारताच्या वकिलाचा दर्जा दिला आहे. भारताने ई- कॉमर्स क्षेत्रात, सायबर सुरक्षा क्षेत्रात, लिक्विड नैसर्गिक वायू क्षेत्रात अमेरिकेचे सहकार्य लाभावे यासाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे. परंतु Trump यांच्या आर्थिक राष्ट्रवादामुळे आणि अमरेकेच्या अविश्वसनियतेमुळे जरी Defence sacretary Mattis हे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भारताला त्यांच्यावर शंका मात्र खूप आहे.

असे असून सुद्धा अमेरिकेने आता तरी भारताचे महत्व लक्षात घेऊन 2+2 भेटीसाठी स्वतः पुढे यावे आणि भारत-अमेरिका दोघांतील संबंध सुधारून आर्थिक धोरणात नवीन कर्यक्रमाचा सहभाग करावा असे Roemer यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here