नवीन चंद्र :

2020 मध्ये चीन आपला स्वतःचा एक ‘कृत्रिम चंद्र’ Artificial Moon लॉंचं करणार आहे. ह्या चंद्रा मुळे रस्त्यावरील लाईट कमी होतील आणि शहरी भागात कमी वीज खर्च होईल अशाने चीनला फायदा होणार आहे.

वास्तविक चंद्र हा नैसर्गिक चंद्रापेक्षा 8 पट जास्त चमकदार असणार आहे. ‘चेंगडू‘ हि दक्षिण-पश्चिम सिचुआन चीनमधील राजधानी आहे, येथेच हा प्रोजक्ट तयार होणार आहे.

मानव निर्मित चंद्र :

जगातील पहिला मानव निर्मित चंद्र सिचुआनमधील ‘झिचांग‘ या उपग्रह प्रक्षेपण केंद्रापासून लॉन्च होणार आहे.

या प्रकल्पातील संस्था ‘चुनफेंग’ यांनी चीन मधील दैनिकाला एका मुलाखतीमध्ये असे सांगितले कि, ‘आमच्या अनुमानानुसार या कृत्रिम चंद्रामुळे या चेंगडू या शहरामध्ये एका वर्षात अंदाजे $173 मिलियन इतके पैसे इलेक्ट्रिसिटी मध्ये वाचणार आहेत. हा प्रोजेक्ट जर सक्सेसफुल ठरला तर 2022 पर्यंत आणखी 3 असे प्रोजेक्ट बनवणार आहोत.’

हा चंद्र सर्वसाधारण स्ट्रीट लाईट पेक्षा दीडपट जास्त प्रकाश देऊ शकणार आहे. या चंद्राची Orbit हि पृथ्वी पासून 500 Km आणि चंद्रापासून 380,000 km अंतरावर असणार आहे.

चीनच्या स्पेस प्रोग्रामची US आणि रशिया यांच्यावर चढाओढी आहे, चीनमध्ये सध्या खूप सारे महत्वाचे प्रोजेक्ट सुरु आहेत. या सर्व प्रोजेक्टपैकी जर हा कृत्रिम चंद्र यशस्वी ठरला तर चीन जगाच्या पाठीवरील अंधाऱ्या बाजूस एक्स्प्लोर करणारा पहिला देश असेल.

कृत्रिम चंद्रासारखा प्रयोग करणारा चीन हा पहिला देश नाही. याच्याअगोदर 1990 मध्ये रशिया ने ऑर्बिटल मिरर चा उपयोग करून सूर्यापासून वंचित असलेल्या नॉर्थन शहरांना प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे 1999 मध्ये हा प्रोजेक्ट बंद करण्यात आला कारण तो मिरर सूर्यप्रकाशास रेफ्लेक्ट करू शकत नव्हता.

तुम्हाला या पोस्ट बद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.