भारतात येत्या जानेवारीत 5G स्पेक्ट्रम trails होणार आहेत. आणि यासाठी भारत चीनच्या Huawei कंपनीला हे देणार असल्याचे निश्चित झाले आहे. भारताचा हा निर्णय खूपच साहसी आहे, कारण असं करण्यास अमेरिकेने भारताला चक्क धमकी दिली होती. तरी देखील भारत चीनच्या Huawei कंपनीला 5G स्पेक्ट्रम Trails देणार, हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. अमेरिकेने भारताला दिलेल्या वॉर्निंग ची बातमी अनेक मोठमोठ्या वृत्तपत्रात छापून आली होती. Financial Times मध्ये सुद्धा ‘Washington warns India over using Huawei for 5G’ या शीर्षकाखाली बातमी छापून आली होती.

सर्वात आधी आपण अमेरिका आणि Huawei यांच्यातील वाद समजून घेऊया

अमेरिकेत Huawei कंपनीला पूर्णतः बॅन करण्यात आलं आहे. सध्याच्या काळात अमेरिका Huawei च्या संपूर्ण विरोधात आहे. ही ट्रेड वॉर च्या सुद्धा पलीकडची गोष्ट आहे.

अमेरिकेचं असं म्हणणं आहे की Huawei ही फक्त दिसायला खाजगी कंपनी आहे, परंतु या कंपनीला चीनची कम्युनिस्ट पार्टी कंट्रोल करते आणि चीनची मिलिटरी सुद्धा या कंपनीला सांभाळते. ही कंपनी जगात ज्या कोणत्या देशासोबत व्यापार करते, आपलं सामान विकते त्या कंपनीची मुखबिरी करते. चीनची Huawei कंपनीसोबत अमेरिकेचे एवढे संबंध बिघडले होते की नुकतंच काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये कंपनीच्या CFO ला अमेरिकेच्या प्रेशर खाली अटक करण्यात आली होती.

आता आपण समजून घेऊया की Huawei कंपनी काय करते ?

5G चा आणि Huawei कंपनीचा काय संबंध आहे.

जगातील येणारा सगळ्यात मोठा ईव्होलुशन हा टेक्नॉलॉजीकल इंडस्ट्री मध्ये होणार आहे. 5G मध्ये तुम्हाला खूपच जास्त फास्ट इंटरनेट स्पीड मिळेल. याचा फायदा प्रत्येक व्यक्तीला तर होईलच पण मोठमोठ्या कंपन्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे.

Huawei काय करते, तर या 5G तंत्रज्ञानाला चालवण्यासाठी साधने पुरवण्याचं काम ही कंपनी करते.
तुम्हाला वाटत असेल की Huawei कंपनी भारतात येणार म्हणजे आता आपल्याला Idea, Airtel प्रमाणे सिम कार्ड मिळतील आणि Huawei चे सुद्धा रिचार्ज प्लॅन आपल्याला पाहायला मिळतील, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते एकदम चुकीचे आहे.

Huawei ही कंपनी साधारणतः साधने पुरवते, Massive MIMO Macro, Massive MIMO Pole Site, Small Cell, Device, Dashboard, Transport, Core ही साधने मुख्यतः आपले ऑपरेटर Idea, Airtel सारख्या कंपन्या विकत घेतील. आपल्या कंपन्या ही साधने Huawei कडून विकत घेतील जेणेकरून त्या कंपन्या आपल्याला 5G टेक्नॉलॉजी पुरवू शकतील. 5G टेक्नॉलॉजी संदर्भात आपल्याकडे खूपच कमी पायाभूत सोयी सुविधा आहेत. आधी त्या आपल्याला बांधने किंवा उभे करणे गरजेचे आहे.

आता तुम्हाला वाटत असेल फक्त Huawei ही एकच कंपनी आहे का, जी अशी सेवा पुरवते ? तर नाही, आशा आणखी काही कंपन्या आहेत. स्वीडनची Ericsson कंपनी आहे, फिनलँडची Nokia सुद्धा हेच काम करते आणि तसेच दक्षिण कोरियाची Samsung सुद्धा काही प्रमाणात असे उपकरणे बनवण्याचं काम करते.

Huawei ला असं समजलं जातं की या क्षेत्रात ही कंपनी सगळ्यांची लीडर आहे. अनेक प्रोडक्ट इतर कंपन्यापेक्षा यांचे उत्कृष्ट आहेत. अनेक तंत्रज्ञानांचे Huawei कडे पेटंट आहेत. तसेच Huawei कंपनी कमी किमतीत खूपच चांगली क्वालिटी पुरवतात.
कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांचं बिझनेस मॉडेल खूपच उत्कृष्ट असल्यामुळे आम्ही एवढ्या कमी किमतीत वस्तू विकू शकतो. अमेरिकेने भारताला Huawei कडून उपकरणे विकत घेण्यास मनाई केली होती. Huawei ला ब्लॉक करण्यास अमेरिकेने भारतावर प्रेशर टाकलं होतं. दुसरीकडे चीनने सुद्धा जर भारताने Huawei ला बॅन केलं तर भारतावर Economic Sanction टाकण्याची धमकी दिली होती. भारत खूपच तणावा खाली होता.

Bharati Enterprises चे चेअरमन सुनील मित्तल यांनी म्हटलं होतं की, “अमेरिकेची सूचना भारताने काळजीपूर्वक घेतली पाहिजे, परंतु निर्णय मात्र राजकीय दृष्टीतूनच व्हायला हवा.” कारण भारताची चीनसोबत खूप मोठी बॉर्डर आहे.

आता आपण हे समजावून घेऊया की भारताने Huawei ला 5G Trail साठी बोलावलं आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे. भारताला यात काय फायदा होणार आहे, ते आपण पाहू.

सर्व काही 5G स्पेक्ट्रम वर आधारित आहे. सरकारला यात खूप मोठी आशा आहे. 2020 मध्ये सरकार 5G स्पेक्ट्रम विकणार आहे. ज्या पद्धतीने 2G, 3G आणि 4G चे स्पेक्ट्रम विकले गेले होते, त्याच प्रमाणे आता 5G स्पेक्ट्रम विकले जाणार आहे आणि याला कोण विकत घेणार तर निश्चितच IDEA, AIRTEL, JIO आणि अन्य कंपन्या, हे स्पेक्ट्रम विकत घेतील. सरकार यात 8293.95 MHz airwaves विकणार आहे, ज्यांची किंमत 5.86 लाख कोटी इतकी असणार आहे. या द्वारे खूप पैसे येतील अशी सरकारला आशा आहे. अनेक रखडलेली कामे सरकार या पैशातून पूर्ण करू शकते. या 5G स्पेक्ट्रमची खरेदी व्यवस्थित व्हावी, अशी सर्वांना अपेक्षा आहे. कंपन्या 5G स्पेक्ट्रम तेंव्हाच खरेदी करतील जेंव्हा त्यांना हा व्यवहार फायदेशीर वाटेल आणि या कंपन्यांना हा व्यवहार तेंव्हाच फायदेशीर वाटेल जेंव्हा 5G टेक्नॉलॉजी साठी लागणारे साधने त्यांना स्वस्त आणि उत्कृष्ट भेटतील आणि अशी उपकरणे Huawei त्यांना पुरवेल.

इतर कंपन्यांचे महागडे उपकरणे तसेच कमी प्रगत असलेली उपकरणे घेण्यास कंपन्या नकार देतील कारण त्यांना अवाढव्य पैसे देऊन देखील Huawei सारखे कमी किंमतीचे प्रगत उपकरणे मिळणार नाहीत.

Idea, Airtel आणि Jio सारख्या कंपन्याना कम्ंफॉरटेबल वाटावे आणि त्या 5G टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करून व्यवहार करावे यासाठी सरकारने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच सरकारने Huawei ला 5G Trails मध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.