चीनने नुकतेच भारताला सूचित केले आहे की पाऊस जास्त झाल्याने ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणातून त्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. हा पाण्याचा विसर्ग गेल्या पन्नास वर्षात झालेल्या विसर्गापेक्षाही मोंठा आहे. त्यामुळे भारताला येणाऱ्या संकटासाठी लवकरात लवकर सज्ज व्हायला हवे.

 ब्रह्मपुत्रा नदीबद्दल थोडीशी माहिती पाहू या

  • या नदीला चीन मध्ये Tsangpo नदी असे म्हणतात.
  • जेंव्हा ती अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते तेंव्हा तिला Siang नदी असे म्हटले जाते. याच भागात तिला दोन नद्या लोहित आणि दिबांग येऊन मिळतात.
  • आणि जेंव्हा ही नदी आसाम मध्ये प्रवेश करते तेंव्हा तिला ब्रह्मपुत्रा म्हणून संबोधले जाते.

चीनच्या रिपोर्ट प्रमाणे Tsangpo नदी खूप वेगाने भरली जात आहे त्यामुळं नदीवरील धरणातून पाण्याचा विसर्ग करणे त्यांना भाग आहे. या धरणातून सुमारे 9020 cumec पाण्याचा विसर्ग होत आहे. आणि हा मागच्या पन्नास वर्षातला सगळ्यात जास्त विसर्ग आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशातल्या तीन जिल्ह्यांना आणि उत्तर आसाम मध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनच्या धरणामुळे आलेल्या पुराच्या आठवणी अजून भारतातील लोक, विशेषतः अरुणाचल प्रदेशातील लोक विसरले नाहीत. इसवी 2000 साली चीन मधल्या Yigong नदीवरील धरण अचानक फुटल्याने अरुणाचल प्रदेशातल्या Pasighat भागात पूर येऊन मोठं नुकसान आणि जीवितहानी झाली होती.

एवढं होऊन देखील चीनने या भागातील नद्यांवरच धरणाचं बांधकाम काही थांबवलं नाही. या भागातील नद्यांवर एकामागून एक अशी धरणं बांधली जात आहेत. यालाच China’s Dam Rush असेही म्हणतात. Zangmu धरण हे गुरुत्वीय धरण असून ते ब्रह्मपुत्रा नदीवर उत्तर-पश्चिम भागातील Gyaca पासून 9 किमी अंतरावर बांधलं जात आहे. या धरणामुळे भारत आणि चीन यांच्यात पहिल्यांदा धरणामुळे तणावाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here