श्रीलंकेत भ्रमंतीसाठी जाऊ इच्छिनाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी एकआनंदाची बातमी आहे .कारण लवकरच भारतीय पर्यटकांना व्हिसाविना प्रवेश मिळू शकणार आहे.श्रीलंकन सरकार भारतीय पर्यटकांना व्हिसाविना प्रवेश देण्याच्या विचारात आहे. भारतासोबतच चीनमधील पर्यटकांनाही व्हिसाशिवाय प्रवेश देण्याचा विचार चालू असल्याचे ,श्रीलंकचे पर्यटनमंत्री जॉन अमरतूगा यांनी सांगितले आहे.

लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिळ ईलम (एलटीटीई) सह यादवी युद्धामुळे दशकभरापूर्वी श्रीलंकेच्या पर्यटन उद्योगाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. तथापि, अलिकडच्या वर्षांत, आशिया हे देशातील सर्वोच्च पर्यटन म्हणून उदयास आले आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत 2018 च्या पहिल्या सहामाहीत पर्यटन 15.3% वाढ नोंदवली आहे.

पर्यटन क्षेत्रातला चालना देण्यासाठी श्रीलंकन सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे .