काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या निर्वाचित पंतप्रधान श्री इम्रान खान यांचा शपथ विधी पार पडला. या वेळी भारतातील पंजाब प्रांतातील नवज्योत सिंग सिद्धू हे मंत्री तिथे हजर होते. तिथे त्यांची भेट पाकिस्तानचे आर्मी जनरल जावेद बाजवा यांच्याशी झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान शिख श्रद्धाळू लोकांसाठी भारत-पाकिस्तान शिख तीर्थक्षेत्र कॉरिडॉर बांधणार आहे आणि त्याचं काम २०१९ पर्यंत पूर्ण केलं जाईल.

भारत-पाकिस्तान बॉर्डर मुळे पंजाब प्रांत विभागला गेला. त्यामुळे पंजाब प्रांताला अनेक त्रासांना सामोरं जावं लागलं. पाकिस्तानात करतारपूर या ठिकाणी आणि भारतात डेरा बाबा नानक या ठिकाणी शिखांची धार्मिक स्थळं आहेत. करतारपूर येथे गुरुद्वारा दरबारसिंग आहे. येथे गुरुनानक 18 वर्षं राहिले होते, इथेच त्यांनी शिखांना एकत्र केलं होतं. त्यामुळं शिखांसाठी हे पवित्र अस धार्मिक स्थळ आहे.पण हा गुरुद्वारा भारत-पाकिस्तान वाटणीत पाकिस्तान मध्ये गेला होता. त्यामुळे भारतातील शिखाना या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी अडचणीला सामोरं जावं लागतं होतं.

पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबारसिंग आणि भारतातील डेरा बाबा नानक यांतील अंतर एवढं कमी आहे की,बऱ्याच वेळा भारतातील शिख लोक गुरुद्वारा दरबारसिंगच्या दर्शनासाठी डेरा बाबा नानक इमारतीवर थांबून कळस दर्शन घेयचा प्रयत्न करतात आणि पाकिस्तानातील शिख लोक भारतातील शिख लोकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून वाटेतील उंच गवत,झाडे व इतर अडथळे बाजूला सारतात.
ही अडचण दूर करण्यासाठी पाकिस्तानने शपथ विधी समारंभात भारत -पाकिस्तान शिख तीर्थक्षेत्र कॉरिडॉर तयार करण्यासाठी हात पुढं केलं आहे. अजून पाकिस्तान सरकारने कार्यालयीन दस्ताऐवजातून स्पष्ट केलं नाही परंतु एवढ्या महत्वाच्या संरमभात म्हटल्यामुळे याची विश्वसनीयता जास्त आहे.

भारत सरकार या ऑफर वर कसं उत्तर देईल,या मुळे भारत -पाकिस्तान संबंध सुधारतील का?, पाकिस्तानावर विश्वास ठेवून भारत काही चूक तर करणार नाही ना?, या मुळे खलिस्तान मुद्यांवर तेल तर पडणार नाही ना? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला थोडं वाट पाहावं लागणार आहे.