इंडोनेशिया एक असा देश जो कि भूकंप आणि त्सुनामी यांचे झटके नेहमीच सोसत असतो, तो देश शुक्रवारी संध्याकाळी आणखी एका संकटाला सामोरं गेला आहे. देशाच्या ‘सुळावेसी बेटाला’ काल भूकंपाचा जोरदार फटका बसला. अगोदर मोठ्या एककाचा भूकंप झाला आणि लगेच काही मिनिटांनी त्सुनामीने बेटावर जोराचा प्रहार केला. इंडोनेशियाच्या स्थानीय वेळेनुसार सुमारे 6 वाजून 2 मिनिटांनी हा भूकंप नोंदवण्यात आला.

घटनेबद्दल अधिक माहिती :-

  • 7.5 magnitude चा मोठा भूकंप सुळावेसी बेटावर झाला. संपूर्ण बेट या हादऱ्यामुळे छिन्न-विच्छिन्न झाला आहे.
  • या मोठ्या हादऱ्यामुळे त्सुनामीने तोंड वर काढले आणि सुळावेसी बेटाला जबरदस्त धडक दिली. या त्सुनामीच्या लाटांची उंची हि २० फूट इतकी होती.
  • या भूकंपाच्या धक्याच्या अगोदरच 6.1 magnitude चा धक्का याच ठिकाणी बसला होता.
  • या भूकंपात आतापर्यंत ३४८ मृत्यूमुखी आणि ३५० पेक्षा जास्त जण जखमी असल्याची माहिती आली आहे.
  • मुख्य भूकंपाचा फटका बसलेलं क्षेत्र हे इंडोनेशियाचे Donggala हे शहर आहे. या शहराची लोकसंख्या 3 लाख आहे.
  • स्थानीय एजन्सीच्या माहितीनुसार त्सुनामी लगभग 10 फूट उंच होती. या त्सुनामीने Donggala आणि Palu या शहरांना धडक दिले.
  • Meteorological, Climatologist and Geophysical Agency च्या म्हणण्यानुसार, ‘ हिंद महासागरात मागच्या इतिहासावरून आणि भौगोलिक माहितीवरून हा भूकंप त्सुनामी तयार करण्यास असमर्थ आहे,’ असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

इंडोनेशियाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक घरे उध्वस्त झाली आहेत आणि अनेक जहाज किनाऱ्यावर मोडून पडले आहेत. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबद्दलची अधिक माहिती तेथील पत्रकारांनी मिळवल्या नंतर लगेचच सर्वांना पुरवली जाईल, अशी वार्ता कळवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here