हा देश प्रशांत महासागराच्या केंद्र स्थानी असून, ३३ लहानमोठ्या बेटांनी बनलेला आणि एकूण ३१० चौ.मिल क्षेत्रफळचा आहे. या देशाची लोकसंख्या एक लाख तीन हजार पाचशे (१०३५००) असून हा जगातला १९७ वा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे. या देशाबद्दलची माहिती पुढील प्रमाणे.

◆ या देशाचं नाव आहे ‘ किरीबस ‘. त्याला इंग्रजी मध्ये ‘ Kiribati ‘ असं लिहिलं जातं. जरी आपल्याला याचा उच्चार ‘किरिबाती’ वाटत असला तरी त्याचा उच्चार ‘किरीबस’ असाच आहे.

◆ या देशाची राजधानी तरावा असून इथेच जगप्रसिद्ध तरावा युद्ध घडलं. जपान्यांनी डिसेंबर १९४१ मध्ये या देशातील तरावा आणि गिल्बर्ट या बेटांना गिळंकृत केलं होतं तेव्हा अमेरिकेन १९४३ मध्ये आक्रमण करून जपान्यांपासून त्या बेटांना सोडवलं. आणि त्या देशाला परत ब्रिटिश सरकारच्या स्वाधीन केलं.

◆ या देशाला १२ जुलै, १९७९ साली ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं.

◆ या देशातील ख्रिसमस बेट हे जगातील सगळ्यात मोठं कोरल बेट आहे. या बेटाच क्षेत्रफळ संपुर्ण देशाच्या क्षेत्रफळाच्या ४५% आहे.

◆ या देशातील दोन बेट जागतिक तापमानवाढीचा शिकार बनत पाण्याखाली बुडाली आहेत. Tebua Tarawa आणि Abanuea ही ती दोन बेटं असून ही संपूर्णतः पाण्यात बुडाली आहेत. १९९९ मध्ये या बेटांना शेवटच्या वेळी बघितलं गेलं होतं, त्यांनंतर ही बेटं दिसली नाहीत.

◆ तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण देशात लंडन, पॅरिस आणि पोलंड अशी गावं आढळतील. येथील लोक खूप खुल्या मनाची आहेत.

◆ पोलंड – पोलंडचा Stanislaw Pelczynski या शोधक आणि इंजिनिअरने या देशाला भेट दिली होती.त्याने या लोकांची खूप मदत केली. त्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली. त्याच्या सन्मानार्थ तेथील लोकांनी त्या गावाला पोलंड असं नाव दिलं.

◆ पॅरिस – फ्रेंच धर्मगुरू Father Emmanuel Rougier यांनी १९१७ ते १९३९ या काळासाठी तेथील बेट भाड्याने घेतलं होतं. आणि तेथे ८ लाख नारळाची झाडे लावली होती. या झाडांमुळे तेथील लोकांना रोजगार मिळाला. आणि किरीबस नारळाचा निर्यात करणार देश बनला. त्यामुळे येथील लोकांनी त्या बेटाला पॅरिस अस नाव दिलं.

◆ ब्रिटिशांच राज्य असताना १९५७ मध्ये ब्रिटिश सरकारने या छोटयाशा देशातील ख्रिसमस बेटावर एकामागून एक हायड्रोजन बॉम्ब च्या चाचण्या घेतल्या.

◆ या देशाचे राष्ट्राध्यक्ष Taneti Mamau आहेत. भारत आणि किरीबस मध्ये समंध ६ ऑगस्ट १९८५ सुरू झाले. किरीबस भारतच्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या उमेदवारी मध्ये भारतच्या बाजूने उभा राहतो.

काही महत्वाची मुद्दे –

हवामान बदल, समुद्र पातळीत होणारी वाढ म्हणजे किरीबस सारख्या देशासाठी अदृश्य होण्याची लक्षणे.

● UN च्या म्हणण्यानुसार येत्या ३० ते ४० वर्षात किरीबस हा देश संपुर्णरीत्या पाण्याखाली बुडालेला असेल.

● या अशा घटना म्हणजे आपल्याला सतर्कतेचा इशारा आहेत. हवामान बदलामुळे होणारे परिणाम हे खूप खतरनाक असणार आहेत.