पाकिस्तानी सरकार ज्याचे पंतप्रधान प्रसिद्ध क्रिकेटपटू इम्रान खान आहेत, त्या सरकारने ना फक्त आपल्या महागड्या गाड्या तर हेलिकॉप्टर आणि आठ म्हशीं यांची निलामी आयोजित केली. ही निलामी इस्लामाबाद मध्ये पंतप्रधान निवासाच्या आवारात आयोजित करण्यात आली होती.

काय आहे हि निलामी?

या निलामी मध्ये असणाऱ्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्स हे बुलेटप्रूफ आहेत. या निलामी मध्ये खरेदीकरांच्या संख्यापेक्षा बघ्यांची संख्या ही कित्येक पटीने जास्त होती. असा अंदाज वर्तवला जात आहे की निलामी मध्ये सरकारला 16 मिलियन डॉलरची मदत होईल. या निलामी मध्ये 100 पेक्षा जास्त कार ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व सरकारी गाड्या होत्या. बऱ्याच गाड्या ह्या 1980 पूर्वी घेतलेल्या होत्या.

या एवढ्या गाड्यांपैकी फक्त 62 गाड्या विकल्या गेल्या आणि यांपैकी सर्वात महागडी गाडी ही $ 200,000 ला विकली गेली ती होती बुलेटप्रूफ टोयोटा लँड क्रूझ. 2005 मधील चार मर्सिडीज ह्या विकल्या गेल्या पण अजून 12 पेक्षा जास्त मर्सिडीज आणि 7 BMWs विकल्या गेल्या नाहीत. या निलामीतील सर्वात महागडी कार जोडी ही Mercedice Maybach S-600 या कंपनीची होती. या जोडीला 2016 मध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विकत घेतली होती. परंतु ही जोडी पण विकली गेली नाही, असं BBC रिपोर्ट्स सांगतात.

पाकिस्तानचं अशी ही पहिलीच निलामी नसून पाकिस्तान सरकारने या आधी सुद्धा अशा निलामी आयोजित केल्या होत्या. परंतु इम्रान खान सरकारची ही पहिलीच निलामी होती, आणि सरकारने याला अधिक महत्त्व दिले होते. पंतप्रधान इम्रान खान जे मागच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून निवडून आले आहेत, त्यांच्यावर सध्या आरोप होतोय की इस्लामबादच ट्रॅफिक बघून हे पंतप्रधान थेट हेलिकॉप्टरलाच प्राधान्य देतील. अफझल नावाच्या एका खरेदी कर्त्याने जो की रावळपिंडीचा आहे त्याने त्या दिवसातील सर्वात मोठी भावतोल केली होती, परंतु तो निलामी सोडून निघून गेला. त्याने 4000 डॉलर मध्ये 2005 चं Suzuki hatchback साठी भावतोल केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here