फेसबुकचा सिईओ मार्क झुकरबर्ग हा जगातील एक श्रीमंत व्यक्ती, मार्कने २३व्या वर्षी अब्जाधीश होण्याचा मान पटकावला होता. मात्र, मार्कला एका २० वर्षीय तरुणीने मागे टाकलय. वयाच्या विसाव्या वर्षी ती अब्जाधीश झालेय. तिची संपत्ती ९०० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात आहे.

मार्क झुकरबर्गला मागे टाकणाऱ्या तरुणीचे नाव आहे ‘केली जेनेर’, केली हि मॉडेल, अभिनेत्री किम कर्दाशिअन हिची सावत्र बहीण आहे. केली ची संपत्ती हि ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात आहे. केली जेनर हि वयाच्या २०व्या वर्षीच अब्जाधीश होण्याचा बहुमान पटकावला आहे. आत्तापर्येंत मार्क हा सर्वात कमी वयात अब्जाधीश झाला होता.

‘केली कॉस्मेटीक्स’या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती साम्राज्ञी आहे. ओठांना अधिक आकर्षक करण्यासाठीची सौंदर्यप्रसाधने हि कंपनी तयार करते. केलीची सध्याची संपत्ती हि ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात असल्याचे ‘फोर्ब्स’ मासिकानं म्हटले आहे. तर ‘केली कॉस्मेटीक्स’ कंपनीचं एकूण बाजारमूल्य हेय ५४ अब्जांच्या घरात आहे.

त्याचबरोबर केलीने जगातील दिग्गज असलेली संगीतकार ‘बार्ब्रा स्ट्रिइसँड’, अभिनेत्री आणि संगीतकर असलेली ‘बेयॉन्स’ आणि प्रसिद्ध संगीतकार ‘टेलर स्विफट’ यांनापण मागे टाकले आहे. दोन वर्षांपूर्वी केली ने हि कंपनी सुरु केली आहे. अभिनेत्री किम ची बहीण असल्याने, केली हि प्रसिद्ध होतीच, मात्र या कंपनीने तिला अधिक प्रसिद्धी मिळवून दिली. ‘फोर्ब्स’ ने नुकतीच ‘self-made US billionaire’ची यादी जाहीर केली. यात केली १९ व्या स्थानावर आहे. याआधी मार्क झुकरबर्ग हा वयाच्या २३ व्य वर्षी अब्जाधीश झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here