आपल्याला माहीतच आहे, सध्या जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती खूप वाढत आहेत. आखाती देशांनी अवलंबिलेले धोरण, अमेरिकेचे सॅकंशन, डॉलर ची वाढती मागणी अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. खरं पाहता एकाच चलनामध्ये वेगवेगळ्या देशांतील तेलाचे भाव तुलनात्मकतेने पाहणे हे योग्य नाही, कारण प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था, तेथील लोकांची खरेदी क्षमता निर्देशांक, त्यादेशातील चलनाची डॉलर च्या तुलनेतील किंमत ही वेगवेगळी असते, कच्च्या तेलाचा वाहतूक खर्च प्रत्येक देशाचा वेगवेगळा असतो. त्यामुळे अशी तुलना ही योग्य असणार नाही. पण एक आपल्याला अंदाज बांधता यावा, विदेशात तेलाच्या काय किंमती (भारतीय रुपया चलनात) आहेत म्हणून याचा असा अभ्यास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जगभरात पेट्रोलची सरासरी किंमत 84.55 रु आहे. आणि सध्या भारतातील सरासरी पेट्रोलची किंमत सुद्धा 84.90 रु आहे. असे असून देखील जगभरातील देशामध्ये पेट्रोलच्या किंमती मध्ये फार मोठा फरक दिसून येतो. कारण सामान्यतः अस असतं की श्रीमंत देशात तेलाच्या किंमती ह्या जास्त असतात तर गरीब आणि तेल उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशात मात्र तेलाच्या किंमती कमी दिसून येतात. याला अपवाद आहे अमेरिकेचा कारण तो देश आर्थिक रित्या खूपच प्रगत आहे. या देशांतील तेलाच्या किमतीमधील तफावत ही देशांनी आकारलेल्या करामुळे आणि दिलेल्या सवलतीमुळे वेगवेगळी असते. सामान्यतः जगभरात पेट्रोलियमच्या किमती सर्वांसाठी सारख्या असतात परंतु त्यातसुद्धा बदल असू शकतात.

जगभरातील महत्वाच्या 35 देशात पेट्रोलची काय किंमत चालू आहे. (चलन-भारतीय रुपया)

 1. इराण – 20.68 रु
 2. सौदी अरेबिया – 39.46 रु
 3. रशिया – 46.56 रु
 4.  इंडोनेशिया – 48.81 रु
 5. पाकिस्तान – 54.63 रु
 6. अफगाणिस्तान – 54.92 रु
 7. अमेरिका – 60.29 रु
 8. व्हिएतनाम – 67.90 रु
 9. नेपाळ – 70.10 रु
 10. श्रीलंका – 71.93 रु
 11. साऊथ आफ्रिका – 75.34 रु
 12. बांगलादेश – 76.75 रु
 13. ऑस्ट्रेलिया – 77.98 रु
 14. ब्राझील – 79.89 रु
 15. चीन – 80.11 रु
 16. कॅनडा – 82.66 रु
 17. भारत – 84.55 रु
 18. जपान – 97.61 रु
 19. पोलंड – 99.31 रु
 20. साऊथ कोरिया- 104.71 रु
 21. स्पेन – 112.21 रु
 22. न्यू झीलंड – 115.12 रु
 23. सिंगापूर – 118.51 रु
 24. स्वित्झर्लंड – 122.69 रु
 25. U. K. – 122.87 रु
 26. जर्मनी – 125.85 रु
 27. फ्रान्स – 131.24 रु
 28. इटली – 137.22 रु
 29. इस्राईल – 137.71 रु
 30. ग्रीक – 139.91 रु
 31. बार्बेदोस – 141.64 रु
 32. नेदरलँड – 142.01 रु
 33. आइसलँड – 146.95 रु
 34. नॉर्वे – 147.41 रु
 35. हॉंगकॉंग – 158.87 रु

नोट – या किंमती १२ सप्टेंबर २०१८ रोजीच्या आहेत, पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज कमी जास्त होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here