सप्टेंबर 2019 पासून कोणकोणत्या भारतीयांचे स्विस बँकेत खाते आहेत, तसेच त्यांच्या संबंधीतील माहिती, भारताच्या टॅक्स ऑथोरिटीजना मिळायला सुरुवात होईल.

Income Tax India ने नुकतंच ट्विट करून ही माहिती दिली आहे. पहिल्यांदा Automatic exchange of Financial account information(AEOI) द्वारे माहितीचं आदानप्रदान होणार आहे. सप्टेंबर 2019 पासून किती आणि कोणकोणत्या भारतीयांचे स्विस बँकेत खाते आहेत तसेच त्यांच्यासंबंधीतील माहिती भारताला मिळणार आहे

सरकारच्या काळ्याधनाविरुद्धच्या लढाईत हे पाऊल खूपच महत्वाचं ठरवणार आहे. स्विस बँक सुरक्षिततेच्या युगाचा लवकरच अंत होताना आपल्याला दिसत आहे. त्याबँकेत खातेदारांना आपली माहिती लपवण्याची मुभा देण्यात येत होती. परंतु ते आता करता येणार नाहीये, भारतीय एजेंसीना ही माहिती देण्यात येणार आहे.

स्विस राष्ट्रीय बँकेच्या माहितीनुसार 2018 मध्ये भारतीय व्यक्ती किंवा व्यापारी कंपन्यांच्या बँकेतील ठेवी 6% नी कमी झाल्या आहेत. जवळपास 6757 कोटी असल्याचं स्विस बँकेने जाहीर केलं आहे.

तुम्हाला वाटत असेल की एवढ्या कमी ठेवी कस काय असू शकतात ? आपण तर लहानपणापासून ऐकत आलो आहोत की स्विस बँकेत कित्येक लाखो कोटी भारतीयांचे आहेत, मग ते पैसे गेले कुठे ?
खरं पाहायला गेलात तर याबाबद्दल ठोस पुरावा कोणाकडेच नाहीये. त्या बँकेत एवढ्या मोठ्याप्रमाणात पैसे होते का नव्हते ? असतील तर कोणाचे होते ? याबद्दल काहीच माहिती कोणाकडे नाही. तेंव्हा बोलला जायचा तो फक्त अंदाज होता किंवा अफवा होत्या असंच म्हणणं जास्त योग्य ठरेल.
परंतु हे ही खरं आहे की मागच्या दहा वर्षांपासून भारत सरकार स्विस बँकेच्या माहितीसाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळे अनेकांनी स्विस बँकेतून आपला पैसा काढून घेतला आहे. स्विस बँकेच्या माहितीनुसार 2011 पासून ठेवी कमी होण्यास म्हणजेच पैसे काढून घेण्यास सुरुवात झाली आहे, दरवर्षी भारतीयांकडून ठेवले जाणारे जवळपास 6% पैसे कमी होतं आहेत.

परंतु 6757 कोटी रुपये हे जरी कमी वाटत असली तरी काळ्या धनाची ही लढाई सुरूच असली पाहिजे. आणि भविष्यात कोणी पुन्हा स्विस बँकेच्या मार्गे लागून काळा पैसा लपवण्याचा प्रयत्न करू नये म्हणून स्विस बँके सोबतचा हा करार महत्वाचा आहे.

काळा पैसा भारतातून स्विस बँकेत कसा पोहचतो?

स्विस बँक ही युरोपच्या मधोमध असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि भारतातून तिकडे पैसे कसे जातात तर यामध्ये सर्वात मोठा हवालाचा रोल आहे. हवाला हे मध्यस्थांचे काम करतात.

  • हवाला मध्यस्थ कशाप्रकारे काम करतात?
  • काळा पैसा स्विस बँके पर्यंत कसा पोहचतो ?
  • त्यांचं नेटवर्क कसं काम करत ?
  • स्विस बँकेतच का काळा पैसा ठेवतात ?

यांची उत्तरे हे एका उदाहरणावरून आपण समजावून घेऊया –

समजा भारताचा एक व्यापारी आहे आणि त्याचं रोजचं कोटयावधीचं उत्पन्न आहे. परंतु त्याला त्या कोट्यवधी उत्पन्नाचं टॅक्स भरायचं नाही. त्यामुळे तो त्या पैशाला कॅश स्वरूपात जमा करतो. असे करत करत तो हजारो कोटी कॅश जमा करतो. परंतु ते पैसे त्याला वापरता येत नाहीत कारण काहीही खरेदी करायचं असेल किंवा इतर कोठे वापरायचं असेल तर त्याला आधी त्या काळ्या धनाला व्हाईट करावं लागेल. त्यामुळे काळा धन जमा करून त्यांना काहीच फायदा नाही, म्हणून ते त्याला व्हाईट करायचा प्रयत्न करतात.

त्यासाठी हे मदत घेतात ते हवाला कॉन्ट्रॅक्टरची. हवाला कॉन्ट्रॅक्टर संपूर्ण जगभरात पसरलेले आहेत. हे एका मध्यस्थाचं काम करतात. ते हजारो कोटी काळ धन ते घेतात आणि त्याला विदेशातच विदेशी चलनात रूपांतर करतात आणि स्वतःचं कमिशन ही घेतात. आता रूपांतरित चलन समजा युरो आहे, तर ते पैसे स्वित्झर्लंड मध्ये स्विस बँकेत ठेवले जातात.

आता स्विस बँकेतच का?

तर स्विस बँकेत कोणत्याही खातेधारकला त्याचे पैसे कोठून आलेत, किती आलेत, मी कोण आहे, अशी कोणतीही माहिती बाहेर जाहीर केली जाणार नाही, अशी सवलत मिळते.

एवढ्या मोठ्याप्रमाणातील काळ धन व्हाईट करायचं काम स्विस बँक करते. या माहितीला संपूर्णतः गुप्त ठेवण्याचं काम स्विस बँक करते.

यापद्धतीने त्या हवाला मध्यस्थाने भारतातील काळ धन स्विस बँकेत व्हाईट स्वरूपात ठेवलं जातं. या पैशाने तो भारतीय व्यापारी युरोपमध्ये घर खरेदी करू शकतो, तिकडे गाडी खरेदी करू शकतो, त्या पैशाने तिकडे फिरू शकतो.

पार्टीसीपेटरी नोट्स काय असतात?

पार्टीसीपेटरी नोट्स हे एक असं माध्यम आहे की ज्या मार्गे कोणताही विदेशी व्यक्ती त्याची स्वतःची आयडेंटिटी जाहीर न करता भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतात. तो व्यक्ती कोण आहे, काय करतो याची काहीच माहिती आपल्याला मिळत आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीतुन मिळाले फायदा ते वापरू शकतात.

आता हे जे हवाला कॉन्ट्रॅक्टर असतात ते या विदेशी गुंतवणूकदारांना भारतातून आलेला काळा पैसा पुरवतात. एखादा भारतीय व्यापारी त्याचा काळापैसा विदेशी गुंतवणूकदाराला देऊन त्याला परत भारतीय बाजारात गुंतवणूक करायला सांगू शकतात. आणि त्यातुन झालेला फायदा मिळवू शकतात.

जर एखाद्या भारतीयाला भारतीय बाजारात गुंतवणूक करायचं असेल तर त्याला आधी पॅन कार्ड, आधार कार्ड, द्यावं लागेल आणि तुम्हाला तुमचा KYC सुद्धा करावा लागेल. पण जर तुम्ही विदेशी व्यक्ती आहात आणि पार्टीसिपेटरी नोट्स द्वारे गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला अशी कसलीही माहिती मागितली जाणार नाही.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आणि सरकारच्या कडक कार्यवाहीमुळे आता पार्टीसीपेटरी नोट्स वर मोठ्याप्रमाणात बंधने आली आहेत. आता सध्या पार्टीसिपेटरी नोट्स द्वारे केलेली गुंतवणूक घटून जवळपास 81,913 कोटी पर्यंत राहिली आहे. एकेकाळी दीड लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक ही पार्टीसिपेटरी नोट्स द्वारे केली जाते.

आता भारतीय आयकर विभागाला स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती मिळणार आहे. ते कसल्या प्रकारचे अकाउंट आहेत? ती सर्व राशी ही काळा पैसा आहे का ? हे सर्व पैसे व्हाईट असण्याची शक्यता पण नाकारू शकत नाही. ते 6757 कोटी रुपये खरच भारतात परत येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही महिन्यातच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या माहितीच्या आदानप्रदानामुळे येत्या काळात स्विस बँकेत काळा पैसा जमा होणार नाही, हे मात्र निश्चित आहे. परंतु आधीचा जो पैसा होता, तो त्याला पकडायला अजून ठोस पाऊलं उचलण्याची आवश्यकता आहे.