अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे अनधिकृत अप्रवासीयांच्या मुलांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तयार केलेली जी योजना आहे त्यानुसार जे कोणी अमेरिकेत अनधिकृत अप्रवासी आहेत त्यांच्या मुलांना आता अमेरिकेची नागरिकता मिळणार नाही.

यामध्ये अशा मुलांचा समावेश होईल ज्यांचा जन्म तर अमेरिकेतला आहे परंतु त्याचे आईवडील हे मात्र अनधिकृत अप्रवासी आहेत. अशा मुलांना आता राईट टू सिटीझनशीप पासून वंचित ठेवलं जाणार आहे. मूलभूत अधिकारांचा बोलबाला करणाऱ्या अमेरिकेनेच आता मूलभूत अधिकारांना पायाखाली तुडवण्याचं काम केलं आहे. यावरून असं दिसतंय की ट्रम्प शासनाने आता लहान मुलांनाही टार्गेट केलं आहे. ट्रम्प ने सोमवारी झालेल्या एका AXIOS इंटरव्हीव्यु मध्ये या गोष्टीचे स्पष्टीकरण दिले.

या इंटरव्हीव्यु मध्ये ट्रम्प बोलले की, मला नेहमी म्हटलं जातं की आपल्या संविधानात घटनादुरुस्ती करा. आधी मला वाटलं की नियमात बदल हे फक्त काँग्रेस कडूनच होतात, पण नंतर मला लक्षात आलं की एक साधा शासकीय आदेश देऊनही मी तसं करू शकतो.

अमेरिका जगाच्या पाठीवर एकुलता एक देश असा आहे जिथे लोक येतात, त्यांना इथे मूल होतं आणि त्या मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व देणं हे आपल्याला बंधनकारक होतं. ही एक हास्यास्पद गोष्ट आहे. हे थांबवलं पाहिजे. आशा प्रकारे नागरिकत्व कोणत्याही देशात दिलं जात नाही.