Brexit हा शब्द Britain आणि Exit या दोन शब्दांचा संयोग करून, म्हणजेच ब्रिटन मधील Br आणि Exit यांपासून Brexit हा शब्द तयार झाला.
याचाच अर्थ ब्रिटनचं युरोपियन युनियन मधून एक्झिट असा आहे.
१. इंग्लंड, ग्रेट ब्रिटन आणि U.K. हे नेमके काय आहेत?
- इंग्लंड – वरील दाखवलेल्या नकाशात पहा. लाल रंगात दाखवलेला भाग हा इंग्लंड म्हणून ओळखला जातो.
- ग्रेट ब्रिटन – वरील दाखवलेल्या नकाशातील इंग्लंड, स्कॉटलंड आणि इंग्लंड शेजारील छोटासा भाग जो व्हेल्स आहे, या तिन्ही भागांना एकत्रित ग्रेट ब्रिटन म्हणून ओळखलं जातं.
- U.K. – इंग्लंड, स्कॉटलंड, व्हेल्स आणि नॉर्थ आयर्लंड या सर्वांचा मिळून U.K. तयार होतो.
इंग्लंड, ग्रेट ब्रिटन आणि U.K. या तिघांमध्ये फक्त U.K. हा देश आहे. बाकी दोन इंग्लंड आणि ग्रेट ब्रिटन हे U.K. या देशाचे भाग आहेत.
सामान्यतः या देशाला ब्रिटन म्हटलं जातं. ब्रिटन हे देशाचं औपचारिक नाव नाहीये, United Kingdom हे औपचारिक नाव आहे.
२. आता आपण पाहूया, EU काय आहे ?
आर्थिक आणि राजकीय भागीदारीतून 28 युरोपियन देश एकत्र येऊन त्यांनी युरोपियन युनियन स्थापन केलं. जे देश आर्थिक व्यापारात गुंतलेले असतात ते आपापसात युद्ध करीत नाहीत, या संकल्पनेतून युरोपियन युनियनची स्थापन करण्यात आली आहे.
ही एक मोठी बाजारपेठ आहे, वस्तूंना आणि तेथील लोकांना मुक्तपणे स्थलांतर करण्याची मुभा हे EU देतं.
1993 आधी हे फक्त आर्थिक युनियन होतं पण 1993 नंतर हे राजकिय युनियन म्हणून सुद्धा पुढे आलं आणि पुढे 2004 मध्ये जेंव्हा सर्व देशांचे एकच युरो हे चलन अमलात आलं, तेंव्हा हे युरोपियन युनियन आर्थिकरीत्या आणि राजकीयरीत्या यशस्वी युनियन म्हणून जगासमोर उभं टाकलं.
- 1973 मध्ये U.K. ने पहिल्यांदा European Economic Community जी की आधी फक्त आर्थिक बॉडी होती, त्याला जॉईन केलं.
- 1975 मध्ये U.K. मध्ये EEC ला जॉईन करण्यासाठी सार्वमत घेण्यात आलं होतं आणि त्यावेळी 68% लोकांनी European Economic Community ला जॉईन करण्याचा कल दिला होता.
- 2010 नंतर काही घटनांमुळे परत एकदा U.K. ने EU मध्ये राहावं की नाही, असा प्रश्न उद्भवू लागला.
- 2014 मध्ये EU च्या संसदीय निवडणुकीत UKIP या पक्षाने U.K. मध्ये 25% मतं मिळाली. 1993 मध्ये हा UKIP पक्ष U.K. ला EU मधून बाहेर काढण्यासाठीच स्थापण्यात आला होता.
- 2015 मध्ये U.K. मध्ये जेंव्हा सामान्य निवडणूक पार पडली तेंव्हा या UKIP या पक्षाला 12% मते मिळाली होती.
या पक्षाची लोकप्रियता वाढत चालली होती. या लोकप्रियतेला संपवण्यासाठी Conservatives पक्षाकडून आपण निवडून आल्यास EU मध्ये राहण्याच्या मुद्यावर सार्वमत घेऊ, असं आश्वासन देण्यात आलं.
2015 मध्ये Conservatives पक्षाचा विजय होतो आणि पुन्हा एकदा डेविड कॅमेरून पंतप्रधान बनतात. परंतु निवडून आल्यावर त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न सार्वमताच दिलेलं आश्वासन पूर्ण करणे, हे होतं. ते त्यांनी 2016 मध्ये सार्वमत घेऊन पूर्ण केलं.
३. EU मधून Exit का करावी ?
- U.K.ला सदस्यता फीस म्हणून अनेक बिलियन युरो युरोपियन युनियन मध्ये भरावे लागत होते, बदल्यात काही बिलियन युरोच मिळायचे. U.K. ला येथे तोटा होत होता.
- युरोपियन युनियन मध्ये राहिल्यामुळे U.K. वर अनेक बंधने आली होती.
- स्वतःसाठी कायदा बनवण्यात त्यांना अडचणी येत होत्या.
- घुसखोरीचे प्रमाण वाढलेले प्रमाण आणि त्यावर कोणतेही धोरण आखता येत नसल्याची परिस्थिती.
- U.K. स्वतःला सिंगापूर प्रमाणे पुन्हा घडवू शकतो, ही भावना.
Nigle Farage आणि Boris Johnson हे दोन मोठे नेते जे Exit कॅम्पेनला सपोर्ट करत होते.
EU मधेच का राहावे ?
- U.K. चा सर्वात जास्त व्यापार हा युरोपियन युनियन सोबत आहे. त्यामुळे वस्तूनां विनाअट विकण्याकरिता युरोपियन युनियन मध्ये राहणे गरजेचे आहे.
- जे काही घुसखोर येत आहेत ते तरुण असून, नौकरीच्या शोधात आले आहेत. त्यामुळे त्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान होते.
- 28 देशाच्या सोबत राहिल्यामुळे आपण जास्त सुरक्षित राहू, ही भावना.
- युरोपियन युनियन मध्ये आणि USA मध्ये Free Trade Agreement मध्ये युरोपियन युनियन ची भावतोल करण्याची क्षमता जास्त आहे, त्यामुळे U.K. ला त्याचा फायदा होईल.
- जे काही व्यापारी लोक आहेत आणि व्यापारी कंपन्या आहेत, त्यांचं म्हणणं युरोपियन युनियन मध्ये राहिल्याने आपल्याला जास्त आर्थिक फायदा होईल, असं आहे.
David Cameron, Theresa May आणि Jeremy Corbyn या नेत्यांनी स्टे कॅम्पेनला सपोर्ट केला. म्हणजे U.K. ने युरोपियन युनियन सोडू नये यासाठी प्रयत्न केला.
अखेर जुन 2016 मध्ये सार्वमत घेण्यात आलं. जवळपास 72% मतदारांनी मतदान केलं. त्या सार्वमतात 51.9% लोकांनी Brexit करा आणि 48.1% लोकांनी Brexit करू नका, असा कल दिला.
परंतु या निकालात खूप विरोधाभास होता, तो तुम्हाला खालचा नकाशा पाहून लक्षात येईल. या नकाशात निळा रंग युरोपियन युनियन मधेच रहा आणि लाल रंग युरोपियन युनियन मधून बाहेर पडा असे दर्शवतात.
यामध्ये स्कॉटलंड आणि नॉर्थ आयर्लंड येथील लोकांनी अत्यंत मजबुतीने युरोपियन युनियन मधेच राहण्याचा इशारा दिला. तर इंग्लंड आणि व्हेल्स येथील लोकांनी युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला आणि आश्चर्याची गोष्ट अशी की इंग्लंड मधील लंडन शहरातील प्रत्येक व्यक्तीने युरोपियन युनियन मधेच राहण्याचा इशारा दिला.
आशा निकालानंतर David Cameron यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि Theresa May या तत्कालीन गृहमंत्री U.K. च्या पंतप्रधान बनल्या. UKIP पक्षाचे अध्यक्ष Nigel Farage यांनी सुद्धा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि Diane James अध्यक्ष बनले. संपूर्ण स्टॉक मार्केट यामुळे कोसळले.
युरोपियन युनियन च्या लिसबन करारातील कलम 50 मध्ये, युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही देशाला 2 वर्षाचा नोटीस पिरियड द्यावा लागतो. आणि तो 2 वर्षाचा काळ, U.K. च्या संसदेने ज्यादिवशी बाहेर पडण्यास मान्यता दिली, त्या दिवसापासून मोजला जातो. हा कायदा 2009 मध्ये तयार करण्यात आला होता. या कायद्यात सार्वमत कोणत्याही सरकारला मानण्यास बाध्य नसल्याचं नमूद आहे.
Brexit च्या आधी ग्रीस सुद्धा युरोपियन युनियन मधून बाहेर पडणार अशी चर्चा होती, त्यावेळी त्याला Grexit म्हणण्यात आलं होतं. Brexit मुळे U.K. चं भविष्य अडचणीत पडलं आहे. स्कॉटलंडच्या आणि नॉर्थ आयर्लंडच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितल आहे की जर U.K. युरोपियन युनियन मधून बाहेर पडला तर आम्ही सुद्धा U.K. मधून बाहेर पडून स्वतंत्र देश होऊन पुन्हा EU मध्ये सामील होऊ, असा इशारा दिला आहे.
U.K. जर युरोपियन युनियन मधून बाहेर पडला तर भारतावर याचे परिणाम काय होतील याचा थोडासा विचार आपण करू.
- भारताचा युरोपियन युनियन मधला सर्वात महत्वाचा मित्र गमवावा लागेल. कारण युरोपियन युनियन आणि भारत यांच्यामध्ये होणाऱ्या कोणत्याही करारात U.K. ने नेहमी भारताची तरफदारी केली आहे.
- संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा दुष्परिणाम होईल आणि त्यासाठी भारताची अर्थव्यवस्था ही अपवाद नसेल.
- काही चांगले परिणाम ही होऊ शकतात, जसे युरोपियन युनियन मधून बाहेर पडल्यानंतर U.K. ला नव्या ट्रेडिंग पार्टनर्सची आवश्यकता असेल आणि भारत ती जागा भरून काढेल.
परंतु खऱ्या अर्थाने, लॉंगटर्ममध्ये Brexit चा जगाच्या, भारताच्या आणि U.K. च्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, हे सांगणं खूप कठीण आहे. मोठमोठ्या तज्ञानी सुद्धा शॉर्टटर्म मध्ये काय होईल एवढंच सांगितलं आहे, लॉंगटर्ममध्ये काय होणार हे येणार काळच आपल्याला सांगेल.