Apple नंतर ऍमेझॉन ही जगातली दुसरी कंपनी ठरली जी 1 खरब अमेरिकन डॉलर एवढ्या बाजार भांडवलाची कंपनी झाली आहे. Apple कंपनीने हे ध्येय मागच्या काही दिवसांपूर्वीच साध्य केले होते. आपल्या या मित्रा पाठोपाठ येत ऍमेझॉननेही आता $ 1 trillion बाजार भांडवलाची कंपनी होऊन आपल्याला मौल्यवान कंपनीचा मान मिळवला आहे. अमेझॉन कंपनीच्या शेअर्सची किंमत $ 2050.27 प्रतिशेअर झाल्यानंतरच अमेझॉनला हा टप्पा गाठता आला.

Mashable च्या अहवालानुसार, जेंव्हा ऍमेझॉन ने आपल्या Amazon Prime Day या कार्यक्रमात एकाच वेळी 100 million वस्तूंचं सेल लावले तेंव्हाच ऍमेझॉनला आपल्या Apple या मित्राबरोबर येता आले. Apple नंतर 50 दिवसातच ऍमेझॉनने आपला हा टप्पा गाठला आहे. Apple हे $1 trillion च ध्येय गाठायला 38 वर्षे लागली तर ऍमेझॉन ला फक्त 21 वर्षे लागली.

Amazon Prime Day सोबतच ऍमेझॉन वेब सर्विस आणि ऍमेझॉन लॉगिस्टिकस यांनी सुद्धा या यशात मैलाचा दगड उचलला आहे. हार्डवेअर श्रेणीमध्ये ऍमेझॉनने आपल्या फायर फोनसह स्मार्टफोन क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण यात ऍमेझॉनला यश आले नाही. परंतु ऍमेझॉनच्या स्मार्ट सहाय्यक स्पीकर ने मात्र लोकप्रियतेचा कळस गाठला आहे.

ऍमेझॉनने विविधिकरणाद्वारे रिटेल उद्योगातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात हात घालत गुंतवणूकदारांना प्रभावित केले आहे. व्हर्जिनिया येथील चार्लोट्सविले येथील चेझ इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचे अध्यक्ष Peter Tuz यांनी म्हटले आहे की, ‘ऍमेझॉनमध्ये किरकोळ विक्रेत्यात आणि वेब सर्विसेसमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.’ “जगभरातल्या रिटेल मार्केट पैकी ऍमेझॉनकडे एक छोटासा हिस्सा आला आहे त्यांना यात अजून काम करण्यासाठी आणि हा व्यवसाय वाढवण्यासाठी भरपूर वाव शिल्लक आहे.” असंही ते म्हणाले

याच दरम्यान ऍमेझॉनने आपले हिंदी इंटरफेस सुरू केले असून यामुळे जवळपास आणखी 100 दशलक्ष भारतीय हिंदी ग्राहकांना आकर्षून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भारतातील खरेदीदारांना ऍमेझॉनच्या अनुभवाचा लाभ घेण्याचा फायदा होणार आहे. यासर्व गोष्टीमुळे येत्याकाळात ऍमेझॉन ही कंपनी खूप भरभराटीला येणार असल्याचे चित्र दिसत आहे, त्यामुळे गुंतवणुकदारांना ऍमेझॉन कंपनी एक खात्रीचे गुंतवणुकीचे ठिकाण असल्याचं लक्षात येत आहे आणि यामुळे ऍमेझॉनच्या गुंतवणुकीत वाढ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here