अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मोठ्या संख्येने आपले विक्रेते असतानाही अमेझॉन इंडियाने आपले वर्चस्व राखण्यासाठी भारतीय बाजारपेठेत आपल्या वेबसाईट आणि अँड्रॉइड मोबाईल अँपसाठी हिंदी इंटरफेस सुरू केले आहे.

कोणत्याही ई-कॉमर्स मार्केटने विभागीय भाषेत काढलेली ही पहिली वेबसाईट आणि मोबाईल App आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याबरोबर खांद्याला खांदालावून उभे राहण्याकरता, नव्हे तर त्यांच्या पेक्षा दोन पाऊले पुढे राहण्याकरता अमेझॉनने हे पाऊल उचलल्याचे वृत्त Economic Times ने आपल्या 30 ऑगस्टच्या आवृत्तीत सांगितले आहे. अमेझॉनने हे पाऊल उचलून वॉलमार्टच्या मालकीच्या Flipkart ला किंवा Alibaba Group चा पाठिंबा असणाऱ्या PayTM ला अवघड केले आहे.

दिल्ली मध्ये मंगळवारी प्रेस मीटिंग मध्ये बोलताना अमेझॉन भारताचे ग्राहक अनुभव आणि मार्केटींग संचालक किशोर थोटा यांनी ही माहिती सांगितली. ते असही म्हणले यासाठी ते मागच्या एक वर्षांपासून काम करत आहेत, आमच्या ग्राहकाच्या आणखी वाढ व्हावी अमेझॉन भारतीयांसाठी आपसूक खरेदी केंद्र बनावं ही आमची इच्छा आहे.

आमचं ध्येय लोकांना काय पाहिजे ते अमेझॉनवर उपलब्द करून देणे भलेही ते देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असेनात त्यांच्यापर्यंत पोहचण्याच आमचं ध्येय आहे. त्यांना कुठेही , कधीही, काहीही, जे पाहिजे ते मिळावे हेच आमचे ध्येय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here