रविवारी रिलायन्स Jio कंपनीने जाहीर केलं की येत्या 6 डिसेंबर पासून अनलिमिटेड प्लॅन्स च्या किंमती 40% नी वाढणार आहेत.
मुकेश अंबानी यांची रिलायन्स Jio ही कंपनी आहे. त्यांनी सांगितलं की या दरवाढीमुळे ग्राहकांना 300% अधिक फायदा होईल तसेच आऊट गोइंग कॉल्ससाठी योग्य उपभोगता धोरण लागू होईल.
लवकरच Jio नवीन प्लॅन घेऊन येत आहे. All-in-One असा हा प्लॅन असणार आहे, ज्यात data आणि voice कॉल्स पण असणार आहेत. इतर मोबाईल नेटवर्क असणाऱ्या ग्राहकांना कॉल करण्यासाठी हे प्लॅन्स फायदेशीर असणार आहेत.
नवीन प्लॅन 6 डिसेंबर 2019 पासून लागू करण्यात येईल.
रिलायन्स Jio ने हे ही सांगितलं की सरकार सोबत tariff कमी करण्यासंदर्भात त्याचं बोलणं सुरूच असणार आहे आणि तसेच इतर सर्व स्टेक होल्डर्स सोबत सहभागातून काम करण्याकरिता आम्ही लक्ष देत आहोत.
Vodafone Idea and Bharati Airtel सुद्धा दरवाढ करणार आहेत.
मागच्या चार वर्षातील पहिल्या दरवाढीत, Vodafone Idea या दिगग्ज कंपन्यांनी सुद्धा नवीन प्लॅन्स जाहीर केले आहेत, ज्यात pre-paid ग्राहकांना कॉल्स आणि data चार्जेस 50% पर्यंत महाग होईल. या व्यतिरिक्त vodafone Idea इतर नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना outgoing कॉल्ससाठी 6 पैसे प्रति मिनिट कॉल दर लावणार आहे.
- कंपनीची सुरुवातीचा प्लॅन जो वर्षभर validity असेल त्यात 50% वाढ होऊल 999/- मध्ये 12 GB data ऐवजी 1499 मध्ये 24 GB data पुरवणार आहेत.
- आणि जो आधी 1699/- मधला प्लॅन 365 दिवसांसाठी रोज 1.5 GB data द्यायचा तो आता 41.2% वाढून 2399/- इतका करण्यात आला आहे.
Vodafone Idea ने जाहीर करताच काही तासांच्या आत Bharati Airtel कंपनीने सुद्धा आपले नवीन प्लॅन्स जाहीर केले. ज्यात कॉल आणि डेटा चार्जेस 3 डिसेंबर पासून 50% वाढवण्यात आल्याची माहिती आपल्याला कळतेय.
Airtel च्या नवीन प्लॅन्सनुसार, 50 पैसे प्रति दिवस ते 2.85 रु प्रति दिवस या रेंज मध्ये दरवाढ झाली आहे आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार 3 डिसेंबर 2019 पासून हे नवीन प्लॅन्स लागू करण्यात येतील.