महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लिमिटेड या भारतीय एस यु व्ही कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) आनंद महिंद्रा आणि MD (व्यवस्थापकीय संचालक) डॉ पवन गोयंका यांनी सोमवारी म्हणजे 3 सप्टेंबर 2018 रोजी, नाशिक येथे महिंद्राच्या नव्या SUV चा लोकार्पण सोहळा पार पाडला. ही महिंद्राची मरॅझो SUV कार असून आंतरराष्ट्रीय बाजार लक्षात घेऊनच ही कार बनवण्यात आली आहे. महिंद्राने सांगितल्या प्रमाणे ही कार उत्कृष्ट आणि आरामदायी असून प्रवासासाठी शार्क माश्याच्या आकारातून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे.

महिंद्रा कार शोरूम मध्ये ही कार एम-2, एम-4, एम-6 आणि एम-8 या चार व्हेरीअंट उपलब्ध असून पहिल्या म्हणजे एम-2 या व्हेरीअंटच्या कार ची किंमत 9.99 लाख रुपये आहे. स्मूथ परफॉर्मन्स, जलद कुलिंग इफेक्ट आणि प्रशस्थ केबिन ही या कारची वैशिष्ट्ये आहेत. या कारचे मायलेज 17-18 किमी प्रति लिटर असणार आहे, असा विश्वास या कंपनीने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here