देशाच्या सर्वात मोठ्या बँकेने म्हणजे SBI ने हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता एखाद्या खात्यात स्वतः खातेधारकाशिवाय दुसरा कोणताही व्यक्ती पैसे भरू शकणार नाही. खातेधारकांच्या अकाउंटला सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे SBI ने सांगितले आहेे. म्हणजे आता एखादा भाऊ आपल्या भावाच्या अकाउंट मध्ये, एखादे वडील आता मुलाच्या अकाउंट मध्ये पैसे भरू शकणार नाहीत. पैसे भरायचे असल्यास त्यांना एक वेगळी पद्धत वापरावी लागेल.

नोटबंदीमध्ये तपास केला असता असं आढळून आलं की, अनेकांच्या अकाउंट मध्ये अनोळखी व्यक्तीने मोठ्या रकमा जमा केल्या होत्या, आणि त्या रकमा जमा करण्यासाठी खातेधारकाची अनुमती नसताना सुद्धा जमा करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे खातेधारक अडचणीत आले होते. कारण कोणता व्यक्ती कोणाच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करतोय याचा काहीच पत्ता लागत नसायचा, ती अडचण दूर करण्यासाठी SBI हा नवीन निर्णय घेतला आहे.

जर तुम्हाला दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवायचे असल्यास –

  1. ज्याच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवायचे आहेत त्याचे अनुमती पत्र आता बँकेत जमा करावे लागेल.
  2. बँकेत पैसे भरण्यासाठी जी स्लिप तुम्हाला भरावी लागते त्यावर त्या खातेधारकाची सही आता आवश्यक आहे.
  3. तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधून ऑनलाइन पैसे दुसऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये पाठवू शकता. यात काही बदल करण्यात आला नाही. कारण यामध्ये कोण कोणाच्या बँकेत पैसे पाठवत आहे, याचा संपूर्ण रेकॉर्ड असतो.
  4. ज्या व्यक्ती कडे ग्रीन कार्ड किंवा इंस्टा डिपॉझिट कार्ड आहे अशा व्यक्ती ते कार्ड वापरून डिपॉझिट मशीन द्वारे दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवू शकतात. कारण या कार्ड द्वारे कळत की कोण कोणाच्या अकाउंट मध्ये पैसे भरत आहे.

असे आहेत SBI च्या खातेधारकांसाठी नवीन नियम. अशाच आणखी बातम्यांसाठी आम्हाला Whatsapp  वर जॉईन करायला विसरू नका.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here