रानू मोंडल हि पूर्वी पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गायेची तेव्हा तिथे अतिंद्र चक्रवर्ती ने त्यांचा विडीओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध केला स्व खर्चाने तिला मुंबई ला आणले.

 

तिला एका टीव्ही रियालिटी शोमध्ये पोहचवण्यासाठी आणि तेथील हिमेश रेशमिया (ज्याने नंतर तिच्या नवीन चित्रपटासाठी तिचे गाणे रेकॉर्ड केले ) सारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींना भेटण्यासाठी सर्व प्रयत्न केले. तिला त्याच्या मुळेच आगामी बॉलिवूड चित्रपटात गाणे गायची संधी मिळाली.

या बदल्यात अतिंद्र चक्रवर्तीला रानू मंडोलकडून काय मिळाले ?

खरं तर कोणाची मदत आपण कोणताही स्वार्थ ठेऊन करत नाही परंतु एक साधे आभार व्यक्त करणारे वाक्य देशातील इतर लोकांना आणखी मदत करायला उत्स्फूर्त करते, पण रानू मोंडल ने आपल्या बाजूने त्या मुलाचे आभार व्यक्त करणे तर सोडा, या स्त्रीने आपले भविष्य बदलण्यामध्ये अतिंद्रच्या पाठिंब्यास देखील कबूल केले नाही, या ऐवजी रानू मंडोल म्हणाली, “मी आज जे काही करतेय ते माझ्या स्वत: च्या परिश्रम, संघर्ष आणि देवाचे आशीर्वाद यामुळे आहे.”

तिच्या प्रतिभेचा आणि कौशल्याचा मी आदर करतो, मला माहित आहे की ती आज जे काही काही आहे ते बनण्यात मुख्य भूमिका हि तिचीच आहे, पण अतींद्र चक्रवर्तीं सारख्या अनेक युवकांना प्रोत्साहनपर का होईना आभार मानायला आहे होते असे मला वाटते.

अशी वृत्ती इतरांना कोणत्याहि गरजू माणसाला मदत करण्याची प्रेरणा देते का हा प्रश्न इथे पडतो

परंतु जेव्हा तेच लोक यशस्वी होतात तेव्हा ते सर्व मदत विसरतात आणि विचित्रपणे वागतात. रानू मोंडल बद्दल तुम्हाला काय वाटत ह्या ठिकाणी तिची काय प्रीतीक्रिया अपेक्षित असायला पाहिजे अस तुम्हाला वाटत कमेंट मध्ये सांगयेला विसरू नका.