27 वर्षाच्या पशुचिकित्सक तरुणीचा रेप करून जाळल्याची घटना आपल्याला माहीतच आहे. संपूर्ण देश या घटनेचा निषेध करत आहे. आपल्याला लाजिरवाणी अशी ही घटना आहे. ऐकल्या क्षणी तळपायाची आग आपल्या मस्तकात जाते. गुन्हेगारांना सुद्धा भर चौकात जाळलं पाहिजे, अशी मागणी आपण सर्वजण करत आहोत.

ही निर्घृण हत्या करणाऱ्या चार जणांपैकी एकाच्या आई ने सुद्धा ही अशी मागणी केली आहे.

‘जर माझा मुलगा अपराधी असेल तर त्याला सुद्धा चक्क जाळून टाकलं पाहिजे’, असं त्या आईच म्हणणं आहे.

एका व्हिडीओ मध्ये या अपराध्यापैकी एकाच्या आईने असे म्हटले आहे की,

“जर माझ्या मुलाने त्या मुलीला जाळून टाकले असेल तर माझ्या मुलाला सुद्धा त्याच प्रकारे जाळून टाकलं पाहिजे. त्या मुलीला सुद्धा आई आहे आणि ती कोणत्या दुःखाला सामोरं जात आहे ते मी समजू शकते.”

  • डॉ प्रियंका रेड्डी असं त्या 27 वर्षीय तरूण डॉक्टरचं नाव आहे. डरमॅटोलोजिस्टशी भेटून आपल्या स्कुटी वरून गोचिबाऊली येथून परत येत होती. अर्ध्या रस्त्यावर तोंडापल्ली टोल प्लाझा जवळ तिची स्कुटी खराब झाली.
  • चार अपराधी जे की जवळपास दारू पित बसले होते, ते तिच्याजवळ गेले. तिला कॅबसाठी टोल प्लाझा पासून खाली घेऊन गेले. ती वर येऊन बघते तर काय तिच्या स्कुटीचा एक चाक कोणीतरी पंक्चर केला होता.
  • या चौघांपैकी एकाने तिच्याकडे मदतीसाठी बोलणी करत असतानाच तिची स्कुटी दुरुस्तीसाठी घेऊन गेला. तेवढ्यात तिने आपल्या बहिणीला फोन केला आणि तिला सांगितल की, स्कुटी खराब झाल्यामुळे ती अडचणीत आहे आणि अज्ञात व्यक्तीं तिची स्कुटी दुरुस्तीसाठी घेऊन गेले आहेत.
  • थोड्यावेळाने तिच्या बहिणीने प्रियंका रेड्डीला फोन केला परंतु तेंव्हा तिचा फ़ोन लागत नव्हता. तिची बहीण टोल प्लाझा जवळ तिला शोधत आली परंतु प्रियंका रेड्डी सापडली नाही.
  • तेंव्हा ती RGIA पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास गेली तेंव्हा तिला समशाबाद पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितले. पोलिसांनी सुद्धा बुधवारी सकाळी 4 am ला शोधायला सुरुवात केली.
  • जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला जो की ओळखण्या पलीकडे होता. शडनगर मध्ये हा मृतदेह सापडला, तिच्या बहिणीने गळ्यातल्या माळेवरून ओळख पटवली.
  • दुसऱ्या दिवशी चार अपराध्याना पोलिसांनी पकडलं. मोहम्मद पाशा, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन आणि चिंतकुंता चेन्नकेशवूल्लू असे या चार अपराध्यांची नावे आहेत. मोहम्मद पाशा हा लॉरी ड्रायव्हर म्हणून काम करायचा तर बाकी तिघे क्लिनर म्हणून काम करत होते.

डॉ. प्रियांका रेड्डीच्या परिवाराने सायबराबाद पोलीस स्टेशनला दोषी ठरवलं आहे. जर पोलिसांनी वेळेवर कारवाही केली असती तर कदाचित ही वेळ आली नसती. या घटनेशी संबंधित तीन पोलीस अधिकाऱ्यांना कमिशनर VC Sajjanar यांच्याकडून निलंबित करण्यात आलं आहे. या तिघांना पुढील ऑर्डर मिळेपर्यंत हे तिघे निलंबीतच राहतील.