शिखर धवनने आपल्या पेक्षा 7 वर्षांनी मोठ्या आणि 2 मुलांच्या आईबरोबर विवाह केला आहे,

आपल्या समाजात आजही लग्ना अगोदर हे बघितलं जात की मुलगा हा मुली पेक्षा वयानं मोठा आहे ना, आणि जर समजा मुलगी मोठी निघाली की मग मोडलं ते लग्न. हे असं का केलं जातं कुणाचं ठाऊक ? कदाचित पुरुष सत्ताक समाज असल्याने असं केलं जातं असावं. आजही आपल्या भारतात विधवा पुनर्विवाह म्हणजे जवळजवळ नाहीच, परंतु समाजामध्ये परिवर्तन खूप वेगाने होत चाललं आहे. जग तंत्रज्ञानामुळे खूप जवळ आहे, लोकांना माहिती खूप सहजासहजी उपलब्द होत आहे.

अशा समाजात राहत असताना सुद्धा शिखर धवनने मात्र आपल्या पेक्षा 7 वर्षांनी मोठ्या आणि 2 मुलांच्या आईबरोबर विवाह केला. जरी ती विधवा नसली तरी तिनं घटस्फोट दिला होता आणि तिला दोन अपत्य होती. शिखर धवनने आपल्या प्रेमापोटी असं केलं, असे म्हणतात पण असं करून दाखवायला शिखर धवनच काळीज लागतं. जेंव्हा आपलं एखाद्या व्यक्ती वरती खरं प्रेम असत तेंव्हा ती व्यक्ती काय करते, कुठली आहे, कशी आहे, तिची जात-पात याचं काहीच देणंघेणं राहत नाही. असंच शिखर धवन बाबतीत घडलं आहे. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांची ओळख ही फेसबुक वरून झाली. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा म्यूचवल फ्रेंड हा हरभजनसिंग होता, त्याच्याद्वारेच या दोघांची ओळख झाली. फेसबुकवरून या दोघांची खऱ्या आयुष्यात सुद्धा चांगली मैत्री जमली आणि दोघेजण नंतर प्रेमात पडले. जेंव्हा ही दोघे प्रेमात पडले त्यावेळी आयशाचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे या दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. प्रेम म्हणजे जी व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारणे, जर प्रेमापोटी एखाद्या व्यक्तीमध्ये बदल घडून येत असेल तर ते प्रेम नसून कॉम्प्रोमाईझ असतं. शिखर धवनने मात्र आपल्या प्रेमाखातर समाजच्या रुढीपरंपरे विरुद्ध झेप घेतली.

शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जी ही भारतीय बंगाली वंशाची आहे. ती ऑस्ट्रेलिया येथे स्थित होती. आयशा चे वडील हे भारतीय तर आई ही ऑस्ट्रेलियन होती. यांच्या लग्नानंतर ते सर्वजण ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते. आयशाचे ऑस्ट्रेलियातच एका व्यक्तीशी लग्न झाले होते, त्याच्या पासून आयशाला दोन आपत्य होती. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. आयशा ही उत्तम खेळाडू असून ती क्रिकेट, टेनिस आशा अनेक खेळांशी संलग्न आहे. क्रिकेटच्या प्रेमामुळेच या दोघांची ओळख झाली आणि 2012 मध्ये जेंव्हा आयशा आणि शिखर धवन यांचं प्रेम झालं त्यानंतर दोघांनी विवाह बंधनात बांधण्याचा निर्णय घेतला.

शिखर धवन आपल्या पत्नीला भलताच घाबरतो. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की,” मी जेव्हा क्रिकेट व्यवस्थित खेळत नाही किंवा माझा फॉर्म बिघडतो तेंव्हा मला माझ्या कोच पेक्षा माझ्या पत्नीचीच भीती वाटते.” असं तो मस्करीत म्हणाला. या दोघांच हे प्रेम असंच अबाधित राहो, याना भावी आयुष्यासाठी आपणासर्वांकडून खूप खूप शुभेच्छा.