आपण कधी विचार केलाय का की आपण रात्रीच का झोपतो.? काही जण दिवसा ही झोपत असतील पण ते अपवादात्मक वेळेला. आपण सहसा दिवसा झोपत नाही आणि रात्री झोपणे ही आपली सवयच झाली आहे. यामागे अनेक कारणे आहेत.

रात्री झोप येण्यामागची कारणे :-

  • रात्री झोप का येते तर याचे सोपे उत्तर असे आहे कि, कित्येक वर्षांपासून आपण रात्रीच झोपतो. ज्यामुळे आपल्याला याची सवय झाली आहे आणि याच सवयीमुळे आपण जास्ततर रात्रीच झोपतो.
  • पूर्वी जेंव्हा या पृथ्वीतलावर प्रकाशाचा शोध लागला नव्हता, त्यावेळी लोकांना रात्री काहीच काम करता येत नसत, प्रकाश नाही तर काम कसं करणार, म्हणून रात्री झोपण्याशिवाय काहीच पर्याय नसायचा.
  • अंधारात आपल्या शरीरातील पेशी या प्रकाशातील पेशींपेक्षा कमी ऍक्टिव्ह असतात. कारण शरीरातील पेशीं ह्या प्रकाशामध्ये जास्त ऍक्टिव्ह असतात. अंधाराला शरीरातील पेशी कमी प्रतिसाद देतात, त्यामुळे अंधारात शरीरातील सर्व पेशीं कमी ऍक्टिव्ह होतात.
  • अंधारात आपले सर्व ज्ञानेंद्रिये (sense organs) सुद्धा कमी रिस्पॉन्स देतात. प्रकाशात आपल्याला दिसते, त्यामुळे डोळे ऍक्टिव्ह असतात, ऊन लागते, गरमी होते त्यामुळे त्वचा सुद्धा ऍक्टिव्ह राहते. तसेच बरीचशी कामे दिवसाच होत असल्यामुळे त्यांचा आवाज, तेथून येणारा गंध यामुळे कान आणि नाक हे अवयव रात्रीपेक्षा दिवसाच जास्त ऍक्टिव्ह असतात.

या सर्व वैज्ञानिक कारणांमुळे आपल्याला जी सवय लागली आहे ती अंधारातील आपल्या शरीराच्या कमी संवेदनशीलपणामुळे लागली आहे. म्हणून आपण सर्वसाधारणपणे रात्री झोपतो. परंतु आता लाईटच्या शोधामुळे आपण रात्री सुद्धा काम करू शकतो. सूर्यप्रकाशाची कमतरता आता लाईटने काही प्रमाणात तरी भरून काढली आहे, आणि त्यामुळेच लोकं आता रात्री सुद्धा जागे राहून काम करत असल्याचं आपल्याला सर्वसाधारणपणे पाहायला मिळत.