सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांना वेळ भेटणे खूप काठीण झाले आहे,त्यात एक-दोन दिवस भेटतात त्यातही विचार पडतो कि सुट्टीचे दिवस घालवायचे कसे. सध्याचे युग हे सॉफ्टवेअरचे झाले आहे, सॉफ्टवेअर मध्ये नौकरी घेत असताना प्रत्येकांना १२ ते १४ तास काम करावे लागते. त्यामुळे थोडासा मोकळा श्वास घेण्यासाठी ते वीकेएंडची आतुरतेने वाट पाहतात. येथे काही गोष्टी आहेत ज्या आपण वीकएंड दरम्यान नक्कीच करू शकता.

१) छंद /आवड पाळा : तुम्ही कामाच्या बाबतीत कितीही ठाम अथवा निर्धारित आसताल तरीही कामकाजाशिवाय काही गोष्टी करायला आवडतात ,काहींना फोटोग्राफीचा, खेळण्याचा, कविता करण्याचा, पुस्तके वाचण्याचा इत्या. गोष्टीचा छंद असतो. ह्या गोष्टी तुमचे निरीक्षण आणि कौशल्य विकसित करण्यात हि मदत करतील. त्यामुळे तुमची आवड बाळगण्यासही मदत होईल आणि वीकेएंडही चांगला जाईल.

२) कामापासून दूर राहा: यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःला कामापासून दूर ठेवा. आपण सतत आपल्या कामाशी कनेक्ट असतो ,ह्यामुळे सुट्टीचे दिवस तुमच्या आनंदावर पाणी फिरवू शकतात. म्हणून २ दिवसासाठी स्वतःला कामापासून दूर ठेवा.

३) कुटुंबासह वेळ घाला: आपण शेवटी जे काही कमवतो ते आपल्या कुटुंबासाठी कमवतो, मग आपण त्या कुटुंबचा आनंद घेत नसल्यास त्या पैशांचा फायदा काय.

आपल्या कुटुंबासोबत सिनेमाला जा ,एका छोट्याश्या रेस्टॉरेन्टवरजा, अथवा हायकिंगसाठी अश्या बराचश्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत जाऊ शकता जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळही घालू शकता आणि तेही आनंदी होतील.

४) पालकांबरोबर वेळ घाला : एकमेकांशी तुमच्या जीवनावर चर्चा करा, कितीही केले तर तुमचे पालक तुमच्यापेक्षा हुशार असतात,आणि कितीही पिढ्या बदलल्या तरी काही गोष्टी सामनाच राहतात. आपल्या पालकांचा आदर आणि त्यांच्यावर प्रेम करा, खूप उशीर होण्याआधी त्यांच्यासोबत वेळ घाला.

५) जुन्या मित्रांना भेटा : कामापूर्वी/विवाहापूर्वी मित्र हेच आपले जीवन होते. त्यांच्याशिवाय आपला वेळ जायचा नाही मग लग्नानंतर काय झाले? जा आणि त्यांना भेटा, त्यांच्याशी वेळ घाला अथवा त्यांच्याशी संपर्कात रहा त्यांच्याशी वेळ घालून तुमच्या जीवनात बरेच बदल झाले नाहीत असे वाटेल आणि वाटेल जीवन म्हणूच नेहमी सुंदर असतं.

६) नवी भाषा शिका : तुम्ही नवनवीन भाषा शिकू शकता जेणेकरून तुम्हला अनेक गोष्टीचा अर्थ समजण्यास मदत होईल .नवीन भाषा शिकल्यामुळे आपल्या शब्दसंग्रहामध्ये वाढ होईल त्यामुळे आपणास स्मरणशक्ती वाढ करण्याकरिता मदत होईल. एक चांगला संवादक होण्यास मदत होईल, जेणेकरून आपले मत इतरांपर्यंत कसे व्यक्त करायचे आहे त्यापेक्षा इतरांना आपले म्हणणे कसे समजेल हे लक्षात येईल. नवीन भाषेमुळे तुम्हाला स्वतःवर एक आत्मविश्वास आलेला असतो ज्यामुळे तुम्हाला चांगला वक्ता होण्यास मदत होते.

७)एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा एक चांगला शनिवार आणि रविवार आपणास येणाऱ्या सोमवार उत्साही ठेवण्यास मदत करतो. जर तुम्ही तुमच्या व्ययक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल ठेवण्यास शिकताल तेंव्हा तुमचा आठवडा आणि आठवड्याच्या शेवटचे दोन दिवस हे समान वाटतील.