आपण रोजच पाहत असतो की, कोणत्याही शाळेची स्कुल बस ही पिवळ्या रंगाचीच असते. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात स्कुल बस ही पिवळ्या रंगाचीच असते. सर्वांसाठी पिवळी स्कुल बस ही कॉमन गोष्ट झाली आहे, त्यामुळे ती अशीच का असते, याचा विचार जास्त कोणी करत नाही. आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहोत.

स्कुल बस हि पिवळ्या रंगाचीच का असते.?  

  • पिवळा रंग हा इतर रंगाच्या तुलनेत जास्तच अट्रॅक्टीव्ह आहे, त्यामुळे बस च्या दिशेने येणाऱ्या वाहनास दुरून पाहताना पिवळा रंग लवकर स्पॉट होतो.
  • स्कुल बस दुरून दिसल्यानंतर समोरील वाहनचालक सतर्क होऊन, अधिक काळजीपूर्वक गाडी चालवतात आणि होणाऱ्या अपघाताची संभावना टळते.
  • पाऊस असो, धुके असो, धुळीचे वादळ असो या सर्वांमध्ये इतर रंगाच्या तुलनेत पिवळा रंग हा ठळक दिसतो.
  • एका संशोधनात वैज्ञानिकांनी असे सांगितले आहे कि पिवळा रंग हा लाल रंगाच्या तुलनेत १.२४ पटीने जास्त फास्ट आकर्षित होतो.
  • सुप्रीम कोर्टाने 2012 मध्ये असा निकाल दिला आहे की स्कुल बस मध्ये सेफ्टी किट, मेडिकल किट सोबतच स्कुल बसचा रंग हा पिवळा असला पाहिजे.

फक्त भारतातील सुप्रीम कोर्टाने नाही तर इतर देशातील त्यांच्या मुख्य न्यायालयाने याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे स्कुल बसचा रंग हा पिवळा असतो.