भारतात एकूण 1401 कारागृहे आहेत आणि त्या कारागृहात एकूण 4 लाखापेक्षा जास्त कैदी आहेत. या 4 लाखापैकी 17834 या महिला कैदी आहेत. या महिला कैदींपैकी 11916 महिलांवरचे आरोप आणखी सिद्ध व्हायचे आहेत. या महिला कैद्यांपैकी 50% महिला या 30-50 वर्षे वयोगटातील आहेत आणि 31% महिला ह्या 18-30 वयोगटातील आहेत.

याचाच अर्थ असा आहे कि, जास्ती महिला कैदी ह्या प्रौढ वयोगटातील आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांना मुले-बाळे असणार हे निश्चित आहे. त्या महिला गुन्हेगार का असेनात पण कितीही केल तरी त्या आई आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या मुलांचं काय होणार याचा निर्णय न्यायालयातच होतो.

● जर समजा कैदीच्या मुलांचे वय 6 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्यांना चाईल्ड केअर होम मध्ये पाठवले जाते.

● जर महिलां कैद्यांचे नातेवाईक सांभाळणार असतील तर त्यांना कोर्ट परवानगी देते. नातेवाईक सुद्धा मुलांना सांभाळू शकतात.

● अनेकदा महिला कैद्यांना त्यांचे नातेवाईक त्यांच्या मुलांची चांगल्याप्रकारे संगोपन करणार नाहीत अशी शंका असते, म्हणून अशा वेळी मुलांना चाईल्ड केअर होम मध्ये पाठवले जाते.

● जर समजा महिला कैद्यांची मुले ही 0-6 वर्षे वयोगटातील असतील तर त्यांची सोय कारागृहातच केली जाते.

● अशा कारागृहात सोय केलेल्या मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जिम्मेदारी न्यायालय स्वतः घेते. न्यायालयाच्या निगराणीत त्या मुलांचे संगोपन होते.

अशा प्रकारे मुलांची सांभाळण्याची सोय केली जाते. कोणीही स्वतः गुन्हेगार होऊ इच्छित नाही, परिस्थिती त्याला तसे करायला भाग पाडते. परंतु सर्व दोष परिस्थितीला देऊन चालणार नाही, कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यावर योग्य मार्गाने मात करता येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here