विद्यापीठांच्या अशा हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना किती त्रास सहन करावा लागत आहे. विद्यापीठातील शिक्षकांच्या कामचुकारपणा, आळस आणि निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या माहितीनुसार दरवर्षी विद्यापीठात सरासरी 75000 विद्यार्थी हे नापास होतात. परंतु 2017 मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर जेंव्हा नापास असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले सोडवलेलेे पेपर रिव्हॅल्युएशनसाठी पाठवले असता, तब्बल 35000 विद्यार्थी हे पास झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही संख्या एकूण नापास झालेल्यांच्या 25% इतकी आहे.

रिव्हॅल्युएशन मध्ये एकदाच 35000 विद्यार्थी जर पास होत असतील तर हा विद्यापीठाचा सर्वात मोठा निष्काळजीपणा ठरणार आहे. पेपर रिव्हॅल्युएशन साठी पाठ्वण्या करिता विद्यार्थ्यांना त्यासाठी फी मोजावी लागते. विद्यापीठाच्या या निष्काळजीसाठी विद्यार्थी भुर्दंड का भरतील. विद्यार्थी आणि पालक या बिनकामीच्या भुर्दंडाकरिता अत्यंत संतापलेले आहेत.

याबाबतीत बऱ्याच जणांनी आपले मत व्यक्त केले आहेत, काहींच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठाने नवीन पेपर तपासणी पद्धत आणली असल्यामुळे नापास होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण इतर कोठेही नाही असे स्पष्ट झाले आहे.