पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेतून ही मोठी बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या 51 शाखा बंद करण्यात आल्या आहेत. सर्व शहरी भागातील शाखा आहेत, असे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. शहरी भागातील 51 शाखांपासून बँकेला कसल्याही प्रकारचा फायदा होत नव्हता, त्यामुळे त्यांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बंद करण्यात आलेल्या बँकांचे IFSC आणि MICR कोड हे रद्द करण्यात आले आहेत. 31 डिसेंबर पासून ते कायमचे रद्द करण्यात येतील. या शाखांमध्ये असलेल्या ग्राहकांचे खाते हे जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत ट्रान्सफर केले गेले आहेत. तिथे त्यांना आता नवीन शाखेच्या IFSC आणि MICR कोडचा वापर करावा लागणार आहे.

बंद झालेल्या बँकेतील ग्राहकांना देण्यात आलेले चेकबुक 30 नोव्हेंबर पर्यंत बँकेत जमा करून, नवीन शाखेतून मिळालेल्या चेकबुक वर आपले व्यवहार करावेत अशा सूचना बँकेकडून देण्यात आल्या आहेत.

भारतात बँक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण 1900 शाखा देशभरात पसरल्या आहेत. त्यापैकी ठाणे (७), मुंबई (६), पुणे (५), जयपूर (४), नाशिक आणि बँगलोर (प्रत्येकी ३), अमरावती, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, सातारा, हैद्राबाद आणि चेन्नई (प्रत्येकी २), नोएडा, कोलकत्ता, चंदीगड, रायपूर, गोवा, सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे. अशा एकूण ५१ शाखा बंद करण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here