आघाडी सरकारच्या काळात अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली होती. नंतर भाजप सरकार आल्यानंतर 2 वर्षाच्या आत सर्व डिपार्टमेंट कडून क्लिअरन्स, परवानगी घेऊन बांधकामाच्या वाटेतील सर्व अडथळ्यांना दूर करण्यात आले होते. त्यांनतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन ही केले होते. परंतु भूमिपूजन करूनही बरेच दिवस/वर्षे बांधकाम सुरुवात झाले नव्हते.
आपल्या राज्याच्या भव्य स्मारकाची चाहूल मिळाल्यापासून अनेक जण याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांसर्वांची वाट बघण्याची वेळ आता संपली आहे, कारण 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता या बांधकामाच्या पायभारणीचे काम सुरू झाले आहे. परंतु या स्मारकाला पूर्ण कराण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 36 महिने म्हणजे कमीत कमी 3 वर्षे लागणार आहेत. जर हे बांधकाम वेळेवर संपले तर 2021 मध्ये आपल्याला शिवस्मारक पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
हे स्मारक एल अँड टी हि कंपनी बांधत आहे. एल अँड टी म्हणजेच लार्सेन अँड टूब्रो कंपनी होय. 15 हेक्टर परिसरात हे स्मारक तयार होणार आहे. या स्मारकाच्या बांधकामासाठी तीन कंपन्यांना टेंडर सोडण्यात आले होते, एल अँड टी कंपनी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि अँपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर. त्यापैकी एल अँड टी कंपनीचे किंमत कमी असल्यामुळे या कंपनीला टेंडर देण्यात आले आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी 3826 कोटी रुपयांचे टेंडर सोडण्यात आले आहे.
या स्मारकामध्ये संग्रहालय, रुग्णालय, मंदिर तसेच रायगडाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती असणार आहे. शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थेटर पण असणार आहे. 16 एकर जमीन वापरून हे स्मारक तयार केले जाईल. त्यात शिवाजी महाराजांचा घोड्यावरील पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यात 180 मीटर उंच लिफ्ट बसवली जाईल आणि बगीचा सुद्धा तयार होणार आहे. या स्मारकाची उंची ही 309 फूट असणार आहे.