भारतातील प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर यांचे दुःखद निधन  झाले.

भारतातील सुप्रसिद्ध पत्रकार श्री कुलदीप नायर यांचं 23 ऑगस्ट 2018 रोजी वृद्धापकाळाने निधन झालं ते 95 वर्षांचे होते. त्यांनी पत्रकार, स्तंभलेखक, मानव अधिकार कार्यकर्ता, लेखक, राज्यसभेत खासदार अशा वेगवेगळ्या कक्षेतून आपले कार्य केले आहे. त्यांनी आजपर्यंत जवळपास 15 पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी भारताचे United kingdom मधील उच्च आयुक्त या पदावर 1990 मध्ये कार्य केलेले आहे.
ते आणीबाणीच्या च्या काळात म्हणजे साल 1975-77 मध्ये ‘Indian Express’ चे संपादक म्हणून कार्य करीत होते. त्यावेळी यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते, त्यावेळी त्यांना याकरिता जेल मध्येही जावं लागलं होत. असं समजलं जातं की ते डाव्या विचारसरणीचे राजकीय समालोचक होते. अशा या अनोख्या विचारसरणीच्या व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली.