किल्लारी भूकंपाचा प्रभाव :-

 • 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी भागात 6.2 एककाचा भूकंप झाला. लातूर शहरापासून अगदी 40 किमी अंतरावरील हे गाव आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदु किल्लारी गावाजवळच 10 किमी खोल पृथ्वीच्या भूगर्भात होता, त्यामुळे याला किल्लारी भूकंप म्हटलं जातं.
 • या भूकंपाचा धक्का अनेक गावांना बसला. जवळपास ’53 गावे’ ही भुईसपाट झाली होती. यात मुख्यतः लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे.
 • लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुका या भूकंपाच्या सपट्यात सापडली होती.
 • जवळपास दहा हजार लोकांचा बळी या भूकंपात झाला होता आणि तीस हजारांपेक्षा जास्त लोकं ही जखमी अवस्थेत होती.
 • या दुर्घटनेत अनेक लहान लहान पोरांची त्यांच्या आईवडीलापासून ताटातूट झाली होती. अनेकांच्या घरचा कर्ता परुष यात मारला गेला होता. काही लोकं तर अशीही आहेत की त्यांच्या घरातील सर्वच जण भूकंपामुळे मारले गेले आणि तो एकटाच जिवंत राहिला आहे.

सरकारने उचलेली पाऊले :-

 • त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री शरद पवार होते. भूकंपाची बातमी मिळताच सरकारतर्फे होईल तितकी मदत त्यांनी केली. भूकंप झाल्यानंतर काही दिवस ते भूकंपग्रस्तांसोबत राहिले सुद्धा होते.
 • भूकंप ग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारी 120 ट्रकांचा पहिला ताफा तंबू, औषध, कपडे आणि राशन घेऊन किल्लारी येथे पोहचले.
 • जखमींच्या उपचारासाठी डॉक्टरांची टीम सुद्धा दुर्घटना स्थळावर पोहलचली होती.
 • राज्यातील अनेक सेवाभावी संस्थांनी यावेळी मोलाची मदत केली होती. अनेक उद्योगपतींनी त्यांच्याकडून होईल तशी मदत पोहचवली होती. महिंद्रा-अँड-महिंद्रा कंपनीने मदतीसाठी चार चाकी वाहनांचा पुरवठा केला होता.
 • देशातील CRPF, SRPF, भारतीय आर्मी, राज्य पोलीस या सर्वांनी प्राणपणाला लावून भूकंप ग्रस्तांची मदत केली.
 • सरकाने पूर्नवसनाचे काम तात्काळ चालू केले, पण त्यामुळे गावांच्या रचनेची अव्यवस्था झाली. यामुळे अनेक गावे दोन ठिकाणी विभागली गेली. लोकांची गावातील चावंड ही पुर्नवसनानंतर नाहीशी झाली, लोकं एकमेकांपासून दूर गेली.
 • सरकारने भूकंपग्रस्ताना सरकारी नौकऱ्यांमध्ये आरक्षण ही लागू केलं. आरक्षणाचा मुद्दा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर निकाली लागला.

भूकंपाची कारणे –

 • भूकंपाच्या कारणांचा विचार करता, भारतीय उपखंड हा नेहमी वरच्या दिशेला सरकत आहे. या प्रक्रियेत भूपट्टाच्या थरातील दबावामुळे हा भूकंप झाला असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
 • आणखी एक महत्वाच कारण म्हणजे तेरणा नदीवरील धरणामुळे हा भूकंप झाला असेल, हे ही सांगितल जातं. पावसाळा नुकताच संपला होता. त्यामुळे तेरणा नदीवर बांधल्या गेलेल्या धरणात भरपूर पाणी साठल होतं. या पाण्याच्या दाबावामुळे भूगर्भात हालचाल होऊन हा भूकंप झाला, असाही दावा केला जात आहे. पाण्याच्या दबावामुळे अनेक ठिकाणी भूकंप झाला आहे, उदा. कोयना भूकंप.

आज उस्मानाबाद येथे आयोजित समारंभात त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. समारंभाच्या बॅनरवर शरद पवारांना उद्देशून ‘तुमच्यामुळेच जगण्याचं बळ मिळाले.’ असं वाक्य छापण्यात आलं होतं.

पहिल्यांदाच आपल्या दाडेचा कर्क रोगाचा उल्लेख सभेत करत ते म्हणाले, “2004 मध्ये जेंव्हा लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्यावेळी माझ्यावर कर्करोगाचे उपचार चालू होते. त्यावेळी एका डॉक्टरांनी मला तुम्ही फक्त सहा महिने जगणार आहात, त्यामुळे काही वाटण्या करायच्या असतील तर उरकून घ्या, असा सल्ला ही दिला होता. त्यावेळी मी त्याला त्याच वय विचारलं आणि त्याच्या वयाच्या दुप्पट वर्ष मी जगुन दाखवेन असं सुद्धा म्हंटल होतं. मला जगण्याची ही हिम्मत कोठून मिळाली तर 1993 मधील एका भूकंप ग्रस्तांकडून मिळाली.

ज्या व्यक्तीच्या परिवारातील सात पैकी सहा सदस्य भूकंपात मारले गेले आणि तो एकटा जीवन ज्या हिंमतीने जगत आहे तिथून मला ही हिम्मत मिळाली. त्यामुळे ‘ भूकंप ग्रस्तांमुळेच मला जगण्याचं बळ मिळाल’. ” असं शरद पवारांनी सभेतील जनतेला म्हटले.