आपल्याला आश्चर्य वाटेल की मुंबई मधले समुद्रकिनारे रात्रीच्या वेळी आपोआप चमकायला लागले आहेत. मागच्या काही दिवसापासून रात्रीच्या वेळी समुद्र किनारा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. अचानक हे समुद्र किनारे चमकायला कसे काय लागले, या अगोदर तर कधी हे किनारे असे चमकत नव्हते? असा प्रश्न तुमच्या मनात असेल. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया.

तुमच्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता पर्यंत दोन शोध मोहीमा झाल्या.

पहिल्या शोध मोहिमेत असा निष्कर्ष काढण्यात आला की समुद्र किनारपट्टीवर जो शैवाळाचा उत्सर्ग झालाय तो औद्योगिक प्रदूषणामुळे, आणि याच शैवळामुळे रात्री समुद्र किनारे चमकायला लागलेत. परंतु दुसऱ्या शोध मोहिमेतील पथकाने औद्योगिक प्रदूषणाचं कारण नाकारलं आणि आपली कारणे पुढे ठेवली.

दुसऱ्या शोध पथकात केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या Indian National Centre For Oceanic Information Services (INCOIS) येथील संशोधक आणि अमेरिकेच्या National Oceanic and Atmospheric Administration यांच्या संशोधकाच्या म्हणण्यासानुसार हा प्रकार जागतिक उष्मावृद्धी मुळे होत असल्याचं स्पष्ट केलं.

संशोधकांनी सांगितलेली कारणे –

  •  समुद्रामध्ये ‘Nocticula’ नावाचं शैवाळ असत ज्याला Sea Tinkle असेही म्हणतात. या शैवाळामध्ये जिवदीप्ती (Biolumiscence) हे वैशिष्ट्य असल्यामुळे ते रात्रीच्या वेळी चमकतात.
  •  परंतु अलीकडच्या काळात या शैवळाच प्रमाण समुद्रात खूप वाढत आहे आणि त्यामुळे समुद्र किनारे अलीकडच्या काळात चमकायला लागले आहेत.
  •  जागतिक उष्मावृद्धीमुळे समुद्राच्या पाण्याच्या वरच्या आणि खालच्या थरात तापमानाचा फरक हा जास्तच वाढलाय. त्यामुळे Diatoms सारख्या सुक्ष्मजीवना लागणारे सिलिकेट समुद्र तळापासून समुद्राच्या पाण्याच्या वरच्या थरात येऊ शकत नाहीत त्यामुळे येथील सूक्ष्मजीवांची संख्या कमी झाली, परिणामी येथील माश्यांची संख्या कमी झाली कारण माश्याना लागणारे Diatoms येथे तयार होत नाहीत. माश्याची संख्या कमी झाल्यामुळे शैवाळाचा प्रादुर्भाव वाढला.

समुद्र किनारपटीच्यावर शैवाळाचे प्रमाण इतके वाढले आहे कि त्यामुळे समुद्र अंधारात चमकायला लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here