महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा नवरात्री मोहत्सव आज पासून सुरू झाला आहे. आई तुळजाभवानी मातेच्या नऊ अवतारावरून हा नवरात्री मोहत्सव साजरा केला जातो. नवरात्रीतील आजचा पहिला दिवस ‘शरद नवरात्री’ म्हणून ओळखला जातो. या मोहत्सवाची सांगता 18 ऑक्टोबर रोजी म्हणजे ‘दसऱ्या’ दिवशी होते. नवरात्रीचा हा मोहत्सव 9 रात्र आणि 10 दिवस चालतो म्हणून याला नवरात्री म्हंटले जाते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. भारतीय कॅलेंडरनुसार हा सण अश्विन महिन्यात येतो. या उत्सवातील प्रत्येक दिवस हा आई दुर्गा मातेच्या अवताराला आणि तिला आवडणाऱ्या नऊ वेगवेगळ्या रंगासाठी समर्पित आहे. या नऊ दिवसासाठी रोज वेगवेगळे भोजन प्रसाद म्हणून तयार केले जाते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात आपापल्या मान्यतेनुसार हा मोहत्सव साजरा केला जातो. हा मोहत्सव सत्याचा विजय आणि अन्यायाच्या पराभवाच प्रतीक म्हणून ओळखला जातो. नवरात्रीतील हे नऊ रंग दुर्गा मातेशी संबंधित आहेत, म्हणून या रंगांचे महत्त्व खूप आहे.

 

● नवरात्रीच्या नऊ दिवसासाठी नऊ विशिष्ट रंग, खालील प्रमाणे सांगितले आहेत –

तारीख ———— दिवस —– रंग

१) 10 ऑक्टोबर —- प्रतिपदा —– निळा

२) 11 ऑक्टोबर — द्वितीया — पिवळा

३) 12 ऑक्टोबर —- तृतीया —— हिरवा

४) 13 ऑक्टोबर —- चतुर्थी —— गजगा(Grey)

५) 14 ऑक्टोबर —- पंचमी —— ऑरेंज कलर

६) 15 ऑक्टोबर —- शष्टी ——- पांढरा

७) 16 ऑक्टोबर — सप्तमी —– लाल

८) 17 ऑक्टोबर — अष्टमी —– आकाशी कलर

९) 18 ऑक्टोबर — नवमी —— गुलाबी

महाराष्ट्रातील जनतेसाठी नवरात्री खुप महत्वाचा सण आहे. अशा या ९ दिवसाच्या वेगवेगळ्या रंगांच्या वेषभूषेनंतर विजयादशमी च्या दिवशी तुम्ही कुठल्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.