आपल्याला माहीतच आहे कि, महाराष्ट्रामध्ये अर्ध्या पेक्षा जास्त भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती खूप बिकट आहे. हिवाळा सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच लोकांना पाणी टंचाई भासत आहे.

शेतीत चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर शेतकऱ्यांना व्यावसायिक पीक घेणे बंधनकारक आहे. कांदा, ऊस, बागायती शेती, पालेभाज्या ही सर्व व्यावसायिक पिके आहेत. पण त्यांचे उत्पन्न घ्यावी म्हटले तर त्यांना भरपूर पाणी लागते. महाराष्ट्रात चांगल्या उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होते. परंतु यावर्षी ऊस लागवड करणे सोपे नाही. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, मग ऊस लागवड कशी करणार.?

यावर शरदजी पवार साहेबांनी खूप उत्तम उपाय सुचवला आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. उसाला चांगला भाव मिळावा म्हणून ते सतत प्रयत्नशील असतात. परंतु यावर्षीच्या होणाऱ्या पाण्याच्या टंचाईमुळे शरद पवारांनी शेतकऱ्यांना व्यावसायिक पीक म्हणून ऊसाला पर्याय सुचवला आहे. तो म्हणजे शेतकऱ्यांनी ऊसा ऐवजी बीटरूट ची लागवड करावी.

बीटला ऊसा पेक्षा कित्येक पटीने कमी पाणी लागते आणि बीटला बाजारात चांगला भाव ही मिळतो. शेतकऱ्यांना सुचवत असताना त्यांनी म्हटले की, 

“युरोप सारख्या खंडात बीट रूटचे मोठ्याप्रमाणात उत्पन्न घेतले जाते. बीट रूट मध्ये ऊसा पेक्षा जास्त प्रमाणात साखर असते. युरोप मध्ये साखर उत्पादनासाठी बीटचा वापर केला जातो. आपल्याला सुद्धा त्याच मार्गाने जावं लागेल. त्याचे सर्वांना फायदे होतील. सर्वात मोठी बचत ही पाण्याची होईल, शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल. ऊसाचे पीक हे वर्ष भराचे आहे तर बीट रूट फक्त चार महिन्यांचे पीक आहे. महाराष्ट्रातील भागात वापणाऱ्या बिट रूटचे सात प्रकारचे वाण आहेत. त्यांच्या लागवडीने महाराष्ट्रात एकरी 40-50 टन उत्पादन निघालेली उदाहरण सुद्धा भरपूर आहेत.”

बारामतीच्या कृषी विकास केंद्राने बिट लागवडीचा प्रयोग गेल्या वर्षी केला होता. त्यात त्यांना 35 ते 40 टन उत्पादन झाले होते. बिट रूट मध्ये खूप क्षमता आहे, या पिकाच्या लागवडीमुळे आपल्याला अनेक फायदे होणार आहेत. ऊसा साठी हा खूप चांगला पर्याय आहे. पारंपरिक शेती कडून आधुनिक शेतीकडे जाण्याचा हा उत्तम मार्ग आहे.