महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शहरात अचानक पूर स्थिती उत्पन्न झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने लोकं विचलित मनस्थितीत आहेत. यापूर्वी पुण्यातील लोकांनी कधीच पुराची स्थिती अनुभवली नव्हती.

या घटनेबद्दल अधिक माहिती पुढील प्रमाणे –

  • ही घटना ‘मुठा‘ नदीच्या कॅनॉलची तटबंदी फुटल्यामुळे उत्पन्न झाली आहे.
  • सिंचन विभागाच्या माहितीनुसार ‘मुठा कॅनॉल’ ची भिंत जवळपास 15 मीटर पर्यंत फुटली आहे, सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली.
  • सिंचन विभागाने याबाबत आणखी म्हटले की, ‘घटनेनंतर तात्काळ मुठा कॅनॉलचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला, पाणी थांबवण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करीत आहोत.’
  • परंतु इंडिया टुडे या वृत्तपत्राच्या माहिती वरून कॅनॉल फुटल्यानंतर तब्बल दोन तासानंतर पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. दोन तास फुटलेल्या कॅनॉल मधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत राहिला.
  • मुठा कॅनॉल हा खडकवासला धरणाशी जोडला गेला आहे. या धरणातूनच कॅनॉलला पाणी पुरवठा होतो.
  • प्रशासन लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यासाठी युद्धपातळीवर कार्य करत आहेत.

  • आत्तापर्यंत कुठलीही जीवित हानी या घटनेमुळे झाली नाही, परंतु अचानक आलेल्या या पूर स्थिती मुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
  • या पुराचा फटका, दांडेकर पूल, सिंहगड रोड आणि बस स्टँड आणि पर्वती टेकडीच्या आजूबाजूच्या वस्तीत राहणाऱ्या लोकांना बसला आहे. काही घरं सुद्धा या पाण्यामुळे मोडकळीस आले आहेत.
  • अचानक आलेल्या या पाण्यामुळे गाड्यांच थोड्याप्रमाणात नुकसान झालं आहे.

सुदैवाने कसल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. पाण्याचे प्रमाण जास्त असल्या कारणाने काही गाड्यांचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे.