भाजपचे लोकसभा सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्या मते महाराष्ट्रात फडणवीस यांनी जी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि लगेच राजीनामा सुद्धा दिला, हा संपूर्ण ड्रामा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेल्या 40 हजार कोटींचा निधी वाचवण्यासाठी केला गेला होता.
माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवण्याकरीता मुख्यमंत्री झाले होते. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला.
अनंत हेगडे यांचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी नाकारला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारला कसलेही पैसे परत करण्यात आले नाहीत. परंतु अनंत हेगडे यांच्या तर्कानुसार, ” देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले. बहुमत नाही हे त्यांना माहीत होतं. त्यांनी हे नाटक का केलं ? हे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे.
आनंत हेगडे पुढे म्हणाले की केंद्राचे 40 हजार कोटी महाराष्ट्र सरकार कडे होते. जर ते पैसे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या हातात लागले असते तर त्याचा दुरुपयोग केला गेला असता. त्यामुळेच हे नाटक केलं गेलं.
हेगडे पुढे म्हणतात, “खूप आधी पासूनच भाजपची ही योजना होती. असं एक नाटक झालंच पाहिजे, म्हणजे काही काळासाठी भाजपचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे, जेणेकरून ही कामे करता यावीत. शपथ घेतल्यानंतर लगेचच 15 तासांच्या आत त्या 40 हजार कोटी रुपयांना केंद्र सरकारला वापस केलं गेलं आणि अशा प्रकारे हे पैसे केंद्र सरकारकडे सुपूर्द करून सुरक्षित ठेवण्यात आले.”
परंतु अनंत हेगडे यांच्या विधानात किती सत्यता आहे, हाच मुळी संशयाचा प्रश्न आहे ? खरंच असं काही घडलं आहे का ? आणि जर घडलं असेल तर राज्य सरकारच्या विकासासाठी आलेले हे पैसे, राज्यातून आपल्या पार्टीची सत्ता गेली म्हणून केंद्राकडे वापस करणे किती योग्य आहे ? याचा आपण सर्व जनतेनी विचार करावा.