• लवासा नाव एकल  कि आपल्याला आठवण येते ती निर्सग रम्य असे वातावरण, सुंदर रस्ते, धुक्यामध्ये असलेल्या सुंदर इमारती, तलाव, उत्तम प्रकारे राखलेली स्वच्छता. हे फक्त आठवत कारण आता परिस्थिती खुपच बदलेली दिसते.
  • कित्येक फोटोग्राफर, सिने स्टार्स आणि प्रवासी इथे येऊन युरोप मधील एका शहरात आल्या सारखे वाटते असे म्हणायचे. ज्या ठिकाणांनी कधीकाळी माणसांच्या WhatsApp, Instagram, Facebook,YouTube वर अगदी धुमाकूळ घातला होता ती ठिकाणे आता Maintenance शिवाय जीर्ण आणि निस्तेज झाली आहेत . पुण्यापासून अंतर ६० किलोमीटर आणि मुंबई पासून १९० किलोमीटर आहे. 
  • भारतातील प्रथम खाजगी रित्या तयार केलेले आणि व्यवस्थापन असलेले शहर, असा भाहुमान मिळालेले हे  शहर . भारतीय व्यावसायिक अजित गुलाबचंद यांचे स्वप्न होते कि इटली च्या पोर्टोफिनो टाउन च्या धर्तीवर भारतात प्रोजेक्ट करायचा ज्या मध्ये ३००००-५०००० लोक राहू शकतील अश्या ५ शहरांचे Cluster बनवायचे .सर्वप्रथम शहराचे नाव “दसवे”
  • पूर्ण प्रोजेक्ट हा १०० वर्ग किलोमीटर मध्ये असलेला आणि Hindustan Construction Company  मार्फत केले जात होते आणि आहे . 

या Artical मधून तुम्हाला काय कळणार आहे ?

१) लवासा सिटी ची सध्या ची परिस्थिती काय आहे?

२) सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत घटक .

  • पर्यावरण खात्याचा हस्तक्षेप
  • जमीन अधिग्रहण
  • पाण्याचा वापर
  • राजकीय  हस्तक्षेप आणि Nepotism
  • नियोजन नियमांचे उल्लंघन

३)  पुढील वाटचाल.

 चला तर मग वेळ न गमावता सुरु करूयात .

१) लवासा सिटी ची सध्या ची परिस्थिती काय आहे?

सध्या लवासा सिटी मध्ये अगदी थोडी माणसे राहत आहेत आणि त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे Security Issue. मोठे क्षेत्रफळ आणि तुरळक security अशी एकंदर परिथिती आहे. दुसरी समस्या म्हणजे Maintenance. लवासा मधील पूल. पाण्यातील बांधकामे, रस्ते, Street Lights हे Maintenance नसल्यामुळे अगदी खराब झालेले दिसून येतात. अनेक constructions हे बंद आहेत अथवा अर्धवट पूर्ण परिथितीत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा. शाळा, कॉलेजेस, मेडिकल, दवाखाने, बाजार हे लावासा पासून लांब असल्याने येथील लोकांना त्याचा फटका बसत आहे. 

२) सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत घटक – 

पर्यावरण खात्याचा हस्तक्षेप –

लवासा हे शहर  पश्चिम घाट या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत  महत्वाच्या ठिकाणी वसलेले आहे . पश्चिम घाट हि UNESCO World heritage site आहे आणि Ecological Hotspot  सुद्धा आहे . येथे Evergreen tropical forests आढळतात आणि 325 species of Vulnerable or endangered animals, birds and fauna यांचे घर हि आहे . आणि साहजिकच जर एवढे मोठे Construction अश्या Ecosystem मध्ये होत असेल तर NGO’s आक्षेप घेणारच.

Indian Ministry of Environment and Forests यांच्या एका मंडळाने २०१० साली पूर्ण Construction site ची पाहणी केली आणि Construction वर Stay आणला . त्यांच्या मते बांधकामाच्या वेळी नियमांचे उल्लंघन झाले आहे . 

९ नोव्हेंबर २०११ ला दुसरे मंडळ आले आणि त्यांनी काही सूचना दिल्या जसे कि Sewage treatment plant बंधने , Local community development programmes चालू करणे ,टेकड्या खोदणे थांबवणे इत्यादी आणि बांधकाम पूर्ण करण्याची परवानगी दिली मात्र बऱ्यापैकी सर्व Investors backfoot वर गेले होते आणि लवासा साठी Market मध्ये जो IPO open करण्याचा बेत होता तो हि राहून गेला . 

जमीन अधिग्रहण

शासकीय आणि खाजगी संस्थांनी लवासा च्या जमीन अधिग्रहणावर आक्षेप घेतला आहे . महाराष्ट्र राज्य सरकार च्या Maharashtra environment department चा असा आक्षेप आहे कि ६०० हेक्टर जमीन जी लवासा कोर्पोरेशन ने खरेदी केली होती ती त्या शेतकऱ्यांना भारत सरकार ने मदत म्हणून देऊ केली होती त्यामुळे रकमेतील ३/४ भाग हा सरकारला देणं होत होता . असाही आरोप लावण्यात आला कि ९८ हेक्टर्स (२४० एकर ) जमीन हि Licence विना विकत घेतली होती . तसेच किमती बांधून भेटाव्यात म्हणून तेथील शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली होती त्याचा परिणाम Construction साठी लागणाऱ्या Investment मध्ये झाला . 

पाण्याचा वापर

लवासा सिटी ला पाणी वासन गाव  जलाशयातून भेटते आणि लवासा च्या Landscape चा मोठा भाग याच्याशी जोडला गेला आहे . इथून चालू झाला पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न. वासन गाव  जलाशय हे खडकवासला जलाशयाला पाणी पुरवण्यात मदत करते . खडकवासला जलाशय हे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असल्याने पुण्यातील राजकीय,सामाजिक क्षेत्रातून या Project ला प्रचंड विरोध झाला . २०११ मध्ये Expert Appraisal Committee of the Union Environment Ministry यांच्या मार्फत सांगण्यात आले कि लावासा मुळे  पाण्याची कमतरता असे काही होणार नाही. जलाशयाची Carring capasity हि अबाधित राहील तरी लोकांचा विरोध कायम राहिला. 

राजकीय  हस्तक्षेप आणि Nepotism

असा आरोप लावला गेला कि जेव्हा Construction साठी मंत्रालयातून मंजुरी पाहिजे होती तेव्हा शरद पवार यांच्या नातलगांनी राजकीय ताकतीचा वापर करून या लवासा Corporation च्या Projects मध्ये मालकी हक्क घेतला . २००४-२००५ साली घरातल्या मंडळीं नि मोठ्याप्रमाणात जागा घेतल्या आणि नंतर विकल्या . शरद पवारांचा पुतण्या त्या वेळी Maharashtra Krishna Valley Development Corporation चा Chairman होता आणि सर्व Clearance यांनीच देऊ केल्या होत्या असा एक राजकीय पाताळातून आरेप समोर येतो . 

नियोजन नियमांचे उल्लंघन 

लवासा कॉर्पोरेशन वर असा आरोप हि झाला कि त्यांनी Maharashtra Regional and Town Planning Act of 1966 मध्ये अधोरेखित केलेले Construction  साठी चे Planning norms violate केले.जसे,प्रथम धारणा पासून ५० मीटर लांब Construction करण्यास परवानगी असे . नंतर ती ३० आणि नंतर १५ ठेवण्यात आली . मात्र लवासा चे बांधकाम हे धरणाच्या पाण्याला लागून करण्यात आले . Ministry of Envirnoment and Forest च्या तपासणी मध्ये या गोष्टीवर आक्षेप घेण्यात आला होता आणि यामुळे प्राणी आणि वनस्पती जीवन संकटात येऊ शकते असे सांगण्यात आले होते. 

या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या कि आपल्याला कळून येईल कि लवासा सिटी एक स्वप्नच राहील आहे . आणि तुम्हाला त्याची महत्वाची करणे सुद्धा कळाली . 

३)  पुढील वाटचाल

पाच छोटी शहरे, शाळा, कॉलेज , स्पोर्ट कॉम्प्लेक्स इत्यादी सुखसोई पुरवण्यासाठी Hindustan Construction Company ने भारतीय बॅंका कडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते . Construction अर्धवट राहिल्याने कर्ज फेड लांबणीवर जात गेली . अश्या वातावरणात Corporation च्या Body मेंबर्स ने याFirm  ला Bankruptcy court मध्ये नेले कारण लवासा Corporation कर्ज फेड शक्य होत नव्हती आणि बँकाना कळत नव्हतं कि यातून कर्जाची रक्कम कशी वसूल होणार . मागील वर्षी Reserve Bank of India ने लवासा मधील अनेक कामे बंद केली जी लवासा या सिटी ला जिवंत ठेवत होती . 

अजित गुलाबचंद यांच्या आकडेवारी नुसार लवासा पुनरूज्जीवन करण्यासाठी १०,००० करोड (१.५ billion ) रुपये लागणार आहेत . (जर याची गम्बीर्यंत लक्षात घेण्यासाठी सर बरोबरी करायची झाली तर २०१९ च्या महाराष्ट्र सरकारच्या  अवकाळी पावसामुळे झालेली पीक नुकसानीची भरपाई १०,००० करोड याच्याशी होईल .)

जागतिक मंदीचा फटका हा भारतीय Construction  Business ला बसला आहे आणि यातच लवासा शहराच्या पुनरूज्जीवनाची आशा हि धूसरच वाटत आहे.

सध्याची  लवासा बद्दल बातमी हि आहे  कि लवासा कॉर्पोरेशन वर बोली मध्ये Haldiram Snacks यांच्या डेव्हलपर कंपनीने २१२५ करोड अशी बोली लावली आहे. पुण्यामधील बिल्डर अनिरुद्ध देशपांडे यांनी १,१७३ करोड इतकी बोली लावली आहे. प्रत्येकाने आपापल्या लावलेल्या बोली मध्ये लवासा मध्ये ते काय काय डेव्हलोपमेंट करणार आहेत तसेच सध्या जी लोक राहत आहेत त्यांच्या बाबतीत ते काय निर्णय घेणार हे सांगितले आहे. सर्व बँकांचा मिळून एकूण ८७१६ करोड इतका क्लेम आहे. 

लवासा साठी कर्ज देणाऱ्या बँक मध्ये प्रामुख्याने युनियन बँक ऑफ इंडिया ७१० करोड, एल अँड टी ६५६ करोड, बँक ऑफ इंडिया ५६७ करोड या आहेत.

याचा अर्थ असा होतो कि Lavasa City या ड्रीम प्रोजेक्टला जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नानं मधील हा हि एक प्रयत्न म्हणता येईल .

मला  आशा आहे कि तुम्हाला या आर्टिकल मधून बरीच माहिती भेटली असेल.अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या या मराठी ब्लॉग ला भेट देत राहा. तुम्हाला जर काही प्रश्न, शंका किंवा काही सुचवायचे असेल तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये सुचवू शकता.