महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त संपूर्ण भारतात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. महात्मा गांधीजींसाठी आपला आदर व्यक्त करण्यासाठी अनेक जन आपल्या समाज कल्याणकारी, कामे, वस्तू आणि वास्तू या सर्वांचे उद्घाटन करीत असतात. भारताची जगाला ओळख करून देण्याच्या कामात पुण्यातील विश्वनाथ कराड यांनी आपलं योगदान दिलं आहे.
विश्वनाथ कराड हे ‘MIT-World Peace University’ चे संस्थापक तसेच महानिदेशक सुद्धा आहेत. त्यांनी एक भव्य घुमट आपल्या विद्यापीठाच्या परिसरात उभं केलं आहे. विश्वनाथ कराड यांची या पाठीमागे 13 वर्षाची मेहनत आहे. कराड हे शिक्षक, वैज्ञानिक, संत आणि महान नेत्यापासून हमेशा प्रेरणा घेत राहतात. विश्वनाथ कराड हे स्वतः सुद्धा एक शिक्षक आहेत. या घुमटाबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे –
घुमटाचे वर्णन :-
- ‘विश्वराजबाग कॅम्पस’ मध्ये 62500 चौ.मीटर जागेत या घुमटाची निर्मिती केली गेली आहे. त्यातील भव्य प्रार्थना घर हे 30 हजार चौ.मीटर जागेत बांधले गेले आहे.
- या कॅम्पस मध्ये असं म्हटलं जातंय की जगातील सगळ्यात ‘मोठा एकच खांब वापरून सर्वात मोठं घुमट तयार केलं गेलं आहे.’ त्याच नाव रहित घुमट अस आहे.
- त्याला विश्वशांती घुमट असेही म्हटले जाते. त्याचा व्यास 160 मीटर इतका आहे आणि त्याची उंची 263 मी. एवढी उंच आहे. याच्या केंद्र स्थानी एक घंटी लटकत आहे.
महान व्यक्ती प्रतिमा :-
- या घुमटामध्ये जगभरातील महान 54 व्यक्तीच्या 4 मीटर पेक्षाही उंच अशा प्रतिमा बसवल्या आहेत.
- या महान व्यक्तींमध्ये गौतम बुद्ध, महावीर, ईसा मसीह, गुरुनानक, मुसा महात्मा गांधी इत्यादींचा समावेश आहे.
- यांच्याबरोबरच थोर विचारवंत प्लेटो, अरस्तू( Aristotle), शंकराचार्य, आर्यभट्ट, कोपर्निकस अशांचा सुद्धा समावेश आहे.
- तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम , मदर टेरेसा, बाबा बुल्ले शाह, अलबर्ट आईन्स्टाईन, थॉमस एडिसन, सी. व्ही. रमण, जगदीश चंद्र बोस, मेरी एस क्युरी इत्यादी संतांचा आणि वैज्ञानिकांचा सुद्धा समावेश आहे.
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांनी या प्रतिमा तयार केल्या आहेत. या प्रतिमा तीन ते चार टनांपर्यंत जड आहेत. ‘अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा पुतळा सुद्धा राम सुतारच तयार करत आहेत.’
या घुमटाबद्दल कराड याना विचारले असता त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं हे जगातील एकमेव घुमट ठरणार आहे. या घुमटाच्या उंच टोकाला सरस्वतीचं मंदिर असणार आहे, तिथे पर्यंत पोहचण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्मारकाच उद्घाटन 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच औचित्य साधून उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे.