अलाहाबाद शहराचे नुकतेच नामकरण करण्यात आले आणि ‘प्रयागराज’ असे ठेवण्यात आले आहे. पूर्वी अलाहाबाद शहराचे नाव प्रयाग असे होते म्हणून आता पुन्हा प्रयाग वरून प्रयागराज करण्यात आले आहे. या नामकरणानंतर देशात नामकरणाची मागणी जोर धरत आहे. अनेक ठिकाणांच्या नामकरणाची मागणी आधी पासूनच होती, परंतु आता ह्या मागण्या वाढत आहेत.

हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमला या शहराचे नाव बद्दलण्याबाबत हिमाचल सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी म्हटलं आहे. इंग्रजांच्या सरकार च्या अगोदर शिमलाचे नाव ‘श्यामला’ असे होते, त्यामुळे आता परत शिमला वरून श्यामला करण्याचा विचार हे सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

इंग्रजांच्या काळात इ.स. 1864 पर्यंत ही देशाची उन्हाळी राजधानी होती. शिमला मध्ये अनेक ठिकाणांचे नाव हे इंग्रज अधिकाऱ्यांचे आहेत, तेही बदलण्याचा विचार हे सरकार करीत आहे. विश्व हिंदू परिषद बऱ्याच वर्षा पासून शिमलाचे नाव बदलन्याबद्दल मागणी करीत आहेत. परंतु 2016 मधील मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांनी, शिमला हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे, त्याच्या नाव बदलामुळे राज्याला नुकसान होईल असे सांगून ती मागणी फेटाळली होती.

विश्व हिंदू परिषदेचे नेते म्हणतात की, गुलामगिरीचे तीन प्रकारची असते त्यात शारीरिक, मानसिक आणि सांस्कृतिक असे प्रकार आहेत. शिमला शहराचे नाव न बदलणे हे मानसिक गुलामगिरीचे प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं.

विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांची अनेक शहरांच्या नावात बदल करण्याची मागणी आहे. त्यात गुजरातमधील अहमदाबाद चे नाव कर्णावती, महाराष्ट्रातील औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि तेलंगणाची राजधानी हैद्राबाद चे नाव भाग्यनगर करण्याची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here