उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथजी यांनी अलाहाबाद या शहराचे नाव बदलून परत ‘प्रयागराज‘ ठेवले जाणार असल्याची घोषणा केली आहे.

मागच्या दोन-तीन महिन्यापासून अलाहाबाद या शहराच्या नामकरणाची चर्चा सुरु होती. उत्तर प्रदेश सरकारने या नवीन नामकरणासाठी हालचाली देखील सुरु केल्या होत्या आणि काल त्या हालचालींचा निर्णय आपल्याला ऐकायला मिळाला, अलाहाबाद या शहराचं नवीन नाव प्रयागराज असे ठेवण्यात येणार आहे.

■ अलाहाबाद शहर :-

  • अलाहाबाद हे भारतातील मोठं मेट्रोपॉलिटन शहर आहे.तसेच वाराणसी नंतर भारतातील सर्वात जुन्या शहरापैकी एक आहे.
  • या शहराच नाव वेदिक काळापासून प्रयागराज असे होते.
  • प्रयाग म्हणजे अशी जागा जेथे प्रार्थना केली जाते, आणि हे शहर तीन नद्यांचे संगम असलेले ठिकाण आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले आहे.
  • ऋग्वेद काळापासून प्रयाग हे लोकांसाठी धार्मिक स्थळ असल्यामुळे याचे महत्त्व खूप आहे.
  • सम्राट अकबरने इ.स.1584 साली या पवित्र शहराचे नाव इलाहाबाद असे ठेवले होते. इलाही या शब्दाचा अर्थ सुद्धा ईश्वर च होतो. अकबराने आपल्या दिन-ए-इलाही या पंथाच्या प्रचारा करीता या शहराचे नाव इलाहाबाद असे ठेवले होते.
  • त्यानंतर शहाजहान ने इलाहाबाद वरून अलाहाबाद केले होते. आणि म्हणूनच तेथील लोक अजून सुद्धा म्हणताना इलाहाबाद असा उच्चार करतात पण लिहिताना मात्र अलाहाबाद(Allahabad) असच लिहितात.
  • प्रयागराज येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो, तसेच 6 वर्षांनी होणारा अर्ध कुंभमेळा होतो. त्यासोबतच 144 वर्षानंतर होणारा महाकुंभमेळा सुद्धा होतो.
  • कुंभमेळा चार ठिकाणी होतो प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक. अर्ध कुंभमेळा हा प्रयागराज आणि हरिद्वार याठिकाणीच होतो. आणि सर्वात शेवटी महाकुंभमेळा हा फक्त प्रयागराज येथेच होतो.

शहराच्या नामकरणानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणखी काही सूचना सांगत होते त्यात त्यांनी सांगितले कि, या कुंभमेळ्याच्या वेळी सर्व भक्तांना किल्ल्यातील अक्षय वट आणि सरस्वतीचे दर्शन घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here