सप्टेंबर महिन्याच्या सहा तारखेला अखेर भारत-अमेरिका 2+2 मीटिंग झाली. यापूर्वी दोन वेळेस ही मीटिंग पुढे ढकलण्यात आली होती, ती आता पूर्णतः संपन्न झाली आहे. या मीटिंग मध्ये सुरक्षेशी निगडित, लष्कराशी निगडित, visa, S-400 सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. याविषयावरील चर्चेत भारताने अमेरिकेकडून काय काय हस्तगत केले ते पाहू या.

या मिटिंगच्या काही दिवसापूर्वी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या ‘Global Times’ या वृत्तपत्राने आपल्या आवृत्तीत एक लेख छापला. त्यात त्यांनी लिहलं होतं की, ‘भारत आणि चीन दोघांनी मिळून अमेरिकेच्या दबावाशी आणि अमेरिकेसोबत संतुलित नातं निर्माण करण्यासाठी काम केलं पाहिजे.’ या मीटिंगच्या अगोदरच हा लेख येणं म्हणजे विचार करण्याचा भाग आहे.

या मीटिंग मध्ये अमेरिकेच्या मुख्य सचिव Michael Pompeo आणि सुरक्षा सचिव James Mattis यांच्याबरोबर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री Sushma Swaraj आणि सुरक्षा मंत्री Nirmala Sitaraman यांची भेट झाली.

1) भारताने अमेरिकेसोबत COMCASA अग्रीमेंट सही केला आहे. या अग्रीमेंटमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षा संबंध आणखी घट्ट झाले आहेत. Communications Compatibility and Security Agreement या मध्ये कार्यालयीन बातचीतसाठी कोडींग भाषेचा वापर केला जातो. या अग्रिमेंटच्या फायद्याबरोबरच काही तोटेही आहेत.

फायदे – भारताने अमेरिकेकडून घेतलेल्या सर्व लष्करी वस्तू, aircraft’s, पाणबुड्या, जहाज यांचा पूर्ण क्षमतेनुसार भारताला वापर करता येत नव्हता.

COMCASA सही केल्यानंतर या यंत्रणांचा पूर्णक्षमतेनुसार वापर करता येणार आहे.

तोटे – भारताने ही जी कोडींग व्यवस्था अमेरिकेकडून घेतली आहे, ती वापरत असताना अमेरिका सुद्धा आपल्या यंत्रणेवर आणि निर्णयावर नजर ठेवू शकत होता.

2) भारताच्या Nuclear Supplier Group मधील प्रवेशासाठी अमेरिका ठोस पाऊलं उचलणार असून चीनला यासाठी कसे राजी करायचे या बद्दल चर्चा झाली.

3) H-1B visa संदर्भात मात्र भारताला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यासाठी नियम शिथिल करण्यासाठी सुषमा स्वराजने अमेरिकेकडून अपेक्षा व्यक्त केल्यात.

4) पाकिस्तानाकडून दहशतवादाला होत असलेल्या प्रोत्साहनासंदर्भात भारत अमेरिका यांच्यात चर्चा झाली. काही सूत्रांकडून आणि काही न्युज चॅनेलच्या म्हणण्यानुसार दाऊदला लवकरात लवकर पकडण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

5) रशियाकडून घेत असलेल्या S-400 या मिसाईल सिस्टम बाबत अमेरिकेकडून काहीच निर्णय घेण्यात आलेले नाहीत असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यात सुद्धा भारताला म्हणावे तसे यश मिळालेले नाही.

वरील सर्व गोष्टींचा विचार करता ही मीटिंग भारतासाठी जास्त काही फायदेशीर ठरली नाही. भारतापेक्षा ती अमेरिकेला जास्त फायदेशीर ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here