हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने तयार केलेलं भारताचं पहिलं मिसाईल ट्रॅकिंग जहाज समुद्रात चाचण्या घेण्यासाठी तयार आहे. हे जहाज संपूर्णतः भारतीय तंत्रज्ञान वापरून तयार केलं गेलं आहे. येत्या काही दिवसात याला भारतीय नौदलाला सोपवण्यात येईल. हे जहाज अतिशय महत्वपूर्ण असून ते खूपच गुप्तरीत्या बनवलं जात आहे. या जहाजाच्या बांधणीवर थेट प्रधानमंत्री कार्यलयाच आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचं लक्ष आहे. थेट प्रधानमंत्री कार्यालयाच लक्ष असणारे खूप म्हणजे खूपच कमी जहाज बांधले जातात, म्हणूनच या जहाजाच महत्व वाढलं आहे.

हे जहाज बांधणीच काम हे भारतीय नौदलाच्या Advanced Technology Vessel कार्यक्रमा सारखच आहे. याची प्रात्यक्षिके जुलै महिन्यात चालू झाली आहेत.हे प्रोजेक्ट ‘अतिउच्च गुप्त प्रोजेक्ट’ म्हणून सांगण्यात येत आहे त्याचा खर्च ₹ 750 कोटी असेल. एवढ्या मोठ्या रकमेचा हा अतिशय गुप्त प्रोजेक्ट आहे. या जहाजाच नाव अजून ठेवण्यात आलं नाही, जेंव्हा नौदलात सामील होईल तेंव्हा याचे नामकरण केले जाईल. सध्या याला VC-11184 या नावानेच संबोधले जाते.

■ जहाजाची वैशिष्ट्ये –

  1. या जहाजामध्ये एका वेळेला 300 सैनिकांचा गट राहू शकतो.
  2. या जहाजावर एक हेलिकॉप्टर उतरवण्याची सोय पण करण्यात आली आहे.
  3. R&AW आणि IB सारखीच National Technical Research Organisation या बोर्डची एक टीम पण या जहाजावर तैनात असणार आहे.
  4. या ट्रॅकिंग जहाजाला मिसाईल रेंज इन्स्ट्रुमेंटशन जहाज असंही म्हटलं जातं. हे जहाज मिसाईल लाँचिंग साठी, ते ट्रॅक करण्यासाठी मदत करत. दुष्मन देशांकडून होणाऱ्या मिसाईल हल्ल्याचा या जहाजामुळे अगोदरच नायनाट करता येणार आहे किंवा त्यापासून बचावाची पूर्व तयारी करता येणार आहे.
  5. या जहाजाची दोन कामे आहेत, एक गस्त घालणे आणि दुसरं वीज तयार करणे. हे जहाज 14 MW इतकी वीज निर्मिती करू शकत.

पूर्व किनारपट्टीवरील विशाखापट्टणम येथे या जहाजाच्या बांधणीच काम चालू आहे. येथील जहाज बांधणी केंद्र हे भारतासाठीचं स्ट्रॅटेजीक पॉईंट आहे. न्यूक्लीअर पावर्ड सबमरीन INS अरिहंत साठी नौदलाच्या दुय्यम ऑपरेशनल बेस, रामबीली हे येथेच आहे. VC-11184 हे भारतीय बंदरात बांधलं गेलेलं सर्वात मोठ्या जहाजांपैकी एक असं जहाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here