अमृतसर दुर्घटनेत आतापर्यंत 61 लोकांचा बळी गेला आहे. काल झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये नवज्योतसिंघ यांनी सर्वांसमोर जाहीर केले की, “मी आणि माझा परिवार अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणापासून नौकारीपर्यंत आणि घरातील सदस्यांना खान्यापासून त्यांच्या दवाखान्यापर्यंतची जिम्मेदारी घेणार आहोत. जे काही मुलं अनाथ झालेत त्या सर्वांना आम्ही दत्तक घेणार आणि त्यांचे संपूर्ण पालन पोषण करणार आहोत.”

झालेल्या ट्रेन दुर्घटनेत अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत, पंजाब काँग्रेस म्हणत आहे की रेल्वे डिपार्टमेंट ने पुरावे नष्ट केले आहेत. त्या ट्रेनच्या 10 मिनिटं अगोदर आलेली ट्रेन जर एकदम हळुवार गेली तर मग ही ट्रेन का गेली नाही.? असे प्रश्न पंजाब काँग्रेसने विचारले आहेत.

काल पंजाब सरकारने दिलेल्या सांत्वना रक्कमेचे वाटप सिद्धू यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक मृता मागे पाच लाख रुपये अशी रक्कम होती. सिद्धूने काल जे स्टेटमेंट दिले आहे त्यावर जर ते खरे उतरले तर त्या सर्व मृतांच्या घरच्यांना खूप मोठा आधार मिळेल. त्यांच्या डोक्यावरील मोठं संकट नष्ट होईल.

राज्याच्या मानवाधिकार आयोगाने यावर एक रिपोर्ट तयार केली आहे. गृहमंत्रालयाकडे ती रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे. त्यात लिहिले आहे की मामला खूप गंभीर आहे. लोकांना आणि जखमींचा प्रबंध व्यवस्थित केला गेला नाही. त्यांच्या देखरेखीत पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी काहीही पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे आयोगाला याची छानबिन करणे आवश्यक आहे.

बाकी काही का असेना दुर्घटनेच्या वेळी दिलेल्या विधानावरून सिद्धू जे कॉन्ट्रोव्हर्सित अडकले होते, त्यापासून त्यांना आता सुटका मिळणार आहे. या दत्तक घेण्याच्या विधानावरून सिद्धू लोकांत प्रिय होतील अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here