भारताला नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडातील देशांना सध्या आर्थिक संकटांना सामोर जावं लागतं आहे. भारताचा विचार करता रुपयाची किंमत घसरणे, भाववाढ, तेलाच्या किंमती वाढणे, FDI कमी होणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. यापैकी भारतीय नागरिकांना सर्वात जास्त त्रासदायक कोणती समस्या ठरतेय तर ती तेलाच्या सतत वाढणाऱ्या किंमती. सध्या जणू तेलाच्या किंमती बहुतेक गगनाला भिडण्याचं नियोजन करत आहेत, असच म्हणावं लागेल.

दिल्ली मध्ये पेट्रोल 80.38 रु/ प्रति लिटर तर डिझेल 72.51 रु/प्रति लिटर वर पोहचले आहे. दिल्ली मध्ये पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती पहिल्यांदा एवढ्या जास्त वाढल्या आहेत. दिल्ली मध्ये पेट्रोलसाठी 80 रु चा आकडा तर पहिल्यांदा पार झाला आहे. जर त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्राचा विचार केला तर स्थिती आणखी वाईट आहे, पेट्रोल 87.77 रु/- प्रति लिटर आणि डिझेल 76.98 रु/- प्रति लिटर याभावाने मुंबईतील नागरिकांना पुरवलं जात आहे. तर पुण्यात पेट्रोल 87.28 रु/- प्रति लिटर दराने विकले जात आहे.

पेट्रोल- डिझेलच्या किंमती का वाढल्या ? ते पाहू

जेंव्हा कुठे संपुर्ण जगाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं असेल तर समजायचे की कुठेतरी यात अमेरिकेचा हात आहे. कारण संपुर्ण जगाचं लेनदेन हे डॉलर मध्ये होतं आणि अमेरिका अजून सुद्धा जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे.

1) अमेरिकेने मागच्या एक-दोन महिन्यात इराणबरोबर झालेल्या न्यूक्लीअर डील मधून हात काढून घेतलाय आणि इराण वर आर्थिक बंधनं लादली आहेत. या आर्थिक बंदनामुळे इराणला दुसऱ्या देशांना कच्च्या तेलाची विक्री करताना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

2) इराण हा भारताचा दुसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा देश आहे, आणि भारत कच्चे तेल आयात करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर तेलावर आपण अवलंबून राहू तर येत्या काळात अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल.

3) OPEC देशांनी मिळून Tight Output Control धोरण स्वीकारल आहे, त्यामुळे या देशांच्या तेल विक्रीवर बंधन आली आहेत, त्यामुळे जगभरात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. सौदी अरेबियाच्या प्रिन्सनी सुद्धा सौदी अरेबियाकडून मिळणाऱ्या तेलाच्या किंमती तर वाढवल्याच आहेत पण तेल विक्री सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी केली आहे. तेलाच्या किंमती वाढव्या म्हणून सौदी अरेबियाने ही खेळी खेळली आहे.

4) आणखी एक कारण जे की खूप कमी महत्वाचं आहे आणि ते म्हणजे पेट्रोल आणि डिझेल हे GST अंतर्गत नाहीत. जर पेट्रोल डिझेल GST अंतर्गत घेतले तर थोड्या प्रमाणात का होईना, सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.

या भावाढीवर विरोधी पक्ष काँग्रेस म्हणतोय की ही भाववाढ सरकारने आकारलेल्या excise duty या करामुळे होतं असून, सरकारने ह्या करामध्ये कपात कराव्यात अशी मागणी काँग्रेसने केली आहे. जर सरकारने करात कपात केली तर तेलाच्या किंमती उल्लेखनियरीत्या खाली उतरतील, असं देशाचे माजी वित्तमंत्री चिदंबरम यांनी म्हटले आहे. या भावाढीच्या विरोधात संपुर्ण देशभर 10 सप्टेंबर रोजी बंद पाळण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाने देशवासियांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here